श्रीरामपूर हादरलं! शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर अज्ञातांचा थरारक गोळीबार, प्रशांत कहाणे थोडक्यात बचावले
Shrirampu firing at ShivSena Activist शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी थेट गोळीबार केला
Shrirampur shaken Unidentified persons firing at ShivSena Activist Prashant Kahane narrowly escapes : राज्यामध्ये सध्या राजकीय नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. भररस्त्यात आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसक घटना घडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. याच मालिकेतील आणखी एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात उघडकीस आला. गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी थेट गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने कहाणे यांचा प्राण थोडक्यात बचावला.
विधान परिषदेत भाजपलाही मत फुटण्याची भीती; नगरसेवकांना थेट गोव्याला नेणार, टूर प्लॅनही समोर
भररस्त्यात चालत्या वाहनावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे श्रीरामपूर परिसर खळबळ उडाली आहे. तसेच पुन्हा एकदा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. यातच श्रीरामपूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. शिवसेना नेते प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात होते. त्याचवेळी गोंधवणी परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहनाच्या दिशेने थेट गोळीबार केला.
प्रशांत कहाणे यांना संपवण्याच्या उद्देशानेच हा गोळीबार केला होता. मात्र, सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने एक मोठी दुर्घटना टळली. प्रशांत कहाणे या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात आणि सुखरूप बचावले आहेत.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, गोळीबार करून पळून गेलेल्या अज्ञात हल्लेखोरांसह त्यांच्या दुचाकीचा शोध घेत आहे.
अजितदादांविषयी अपशब्दानंतर पक्षातून हकालपट्टी, हे सर्व प्री प्लॅन… म्हणत मासाळ आक्रमक
या धक्कादायक प्रकाराची माहिती हाती येताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि संपूर्ण स्थानिक पोलीस फौजफाट्याने क्षणाचाही विलंब न लावता थेट घटनास्थळ गाठले. अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या अज्ञातांनी हा हल्ला नेमक्या कोणत्या उद्देशाने केला यामागे काही राजकीय वैमनस्य आहे की अन्य कोणते वैयक्तिक कारण आहे याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. तसेच गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या दुचाकीचा मागोवा घेण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.