मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र मिळणार नाही; कुणबी नोंदींवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठ वक्तव्य

CM Devendra Fadnavis on Maratha OBC Reservation : मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते.
पुणे : मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Maratha) ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं.
मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार नाही, ओबीसींच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र देणार नाही. काहीही झाले तर ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. ओबीसींकरता योजना करणारे हे सरकार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच, आमच्या सरकारची नीती पक्की आहे. एकाचे काढून दुसऱ्याला द्यायचे नाही. इंग्रजांनी जे केलं ते आम्ही करणार नाही. मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही. मराठावाड्यात 1948 पर्यंत इंग्रज राज्य नव्हते, तर निजाम राज्य होते. मराठवाड्याचे रेकॉर्ड हैदराबाद गॅझेटमध्ये होते. ज्यांच्याकडे नोंद असेल त्याला प्रमाणपत्र दिले जाईल असंही ते म्हणाले.
दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या रामोशी समाजाचा संबंध हा प्रत्यक्ष श्रीराम याच्याशी आहे. रामोशी समाजाच्या राजाचे कार्य अतुलनीय आहे. शिवाजी महाराज याच्या स्वराज्यामध्ये बहिर्जी नाईक रामोशी हे महाराजाचा विश्वासू होते, गुप्तहेर होते. बहिर्जी नाईक हे तिसरा डोळा म्हणून काम करत होते. देव देश धर्माच्या लढ्यात हा रामोशी समाज अग्रेसर होता. ब्रिटिशांना पहिला विरोध राजे उमाजी नाईक यांनी केला. त्यांनी सेना तयार करून इंग्रजांना पळवले. रॉबर्ट यांनी पत्र लिहिले का उमाजी नाईक शिवाजी महाराज झाले असते. उमाजी नाईक हे उत्तम प्रशासक होते, स्वतःच्या हाताने त्यांनी पत्र लिहिले आहेत.
उमाजी नाईक सापडले नसते पण फितुरी झाली. शुभराजे पण असेच पकडले गेले. राजे उमाजी नाईक यांना पकडून इंग्रजांनी फाशी दिली. पण समाजाची लढाई थांबली नाही. इंग्रजांनी गुन्हेगारी कायदा करून समाजाला गुन्हेगार ठरवले. यांना नाही दाबले तर राज्य करता येणार नाही हे माहिती होते. पण इतिहासाने या समाजाचा इतिहास कधीच पुढे येऊ दिला नाही,. जवळपास 80 वर्षे गुन्हेगारी म्हणून समाज मागे गेला, त्यांचा विकास नाही झाला. आता सरकारचा प्रयत्न आहे की त्यांना त्यांचा विकास शौर्य आठवण करून द्यायचा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असंही ते म्हणाले.