अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, महिला बालकल्याण व स्थायी समिती सदस्यांची घोषणा

महासभेत स्वीकृत नगरसेवकांची नावे तसेच स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

  • Written By: Published:
Untitled Design 109

Special general meeting organized today at Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महानगरपालिका येथे आज विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत स्वीकृत नगरसेवकांची नावे तसेच स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. विविध पक्षांच्या गटनेत्यांनी आपापल्या सदस्यांची यादी महापौर ज्योती गाडे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर सभागृहात ही घोषणा करण्यात आली.

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकी जगताप, भैय्या पवार आणि बाबासाहेब नागरगोजे यांची निवड जाहीर करण्यात आली. भाजपकडून रवींद्र बारस्कर आणि विशाल नाकाडे यांना संधी देण्यात आली असून शिवसेनेकडून आदेश जाधव यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे.

याचबरोबर स्थायी समिती सदस्यांचीही घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून गौरी बोरकर, सुरेश बनसोडे, संध्या पवार, मीना चोपडा, पौर्णिमा गव्हाळे आणि हरप्रीतकौर गंभीर यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपकडून सुभाष लोंढे, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, मनोज दुल्लम, मनोज कोतकर आणि सोनाबाई शिंदे यांची नावे जाहीर झाली. शिवसेना (शिंदे गट) कडून नवनाथ कातोरे आणि सुनिता गेनप्पा यांची निवड झाली आहे. काँग्रेसकडून मिनाज खान तर एआयएमआयएमकडून शेहनाज शेख यांचा स्थायी समितीत समावेश करण्यात आला आहे.

भारताचा आज झिम्बाब्वेशी सामना; सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक

दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांचीही अधिकृत घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून दीपाली बारस्कर, सुनीता भिंगारदिवे, अनिता शेटिया, काजल भोसले, सुनीता कांबळे आणि अश्विनी लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून वंदना ताठे, शितल ढोणे, पुष्पा बोरुडे, आशा कातोरे, रोशनी त्र्यंबके आणि वर्षा सानप यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून मंगल लोखंडे आणि रुपाली दातरंगे यांची निवड झाली असून काँग्रेसकडून मिनाज खान आणि एआयएमआयएमकडून शेहनाज शेख यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

विशेष महासभेत या सर्व निवडींना अधिकृत मान्यता देण्यात आली. आगामी काळात स्थायी समितीमार्फत शहरातील विकासकामांवर निर्णय घेतले जाणार आहेत, तर महिला व बालकल्याण समितीमार्फत महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना व उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

follow us