Sushma Andhare : 18 वर्षांपूर्वी हरवलेला सुषमा अंधारेंचा भाऊ सापडला

Sushma Andhare : 18 वर्षांपूर्वी हरवलेला सुषमा अंधारेंचा भाऊ सापडला

शिवसेना ठाकरे गटाच्या ( Shivsna Thakrey Camp )  नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare) यांनी एक भावनिक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 18 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला आहे, अशी माहिती दिली आहे. अतिशय भावनिक शब्दात त्यांनी ही पोस्ट लिहली आहे. 18 वर्षांपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याने घर सोडले होते, असे अंधारे यांनी सांगितले. आमचं संयुक्त कुटुंब आहे, कुटुंबात तब्बल 48 माणसं आहेत. त्याला वास्तव हा चित्रपट आवडायचा,  ते पाहून काही तही वेगळं करण्यासाठी तो घर सोडून गेला होता, असे अंधारे म्हणाल्या.

दोन-तीन दिवस तू कुठेतरी गेला असेल परत येईल असं वाटलं. अनेक ठिकाणी चौकशी केली. टीव्ही किंवा वर्तमानपत्रात हरवल्याची जाहिरात दिली तर त्याच्या जीवाला धोका होईल का अशी एक भाबडी भीती कुटुंबीयांना वाटत होती. महिने उलटून गेले वर्ष उलटली पण तो काही परत आलाच नाही. एके दिवशी त्याने मला पोस्टरवर पाहिले व त्याने मला ओळखले.  त्याने प्रथम माझ्या फेसबुक  मित्र यादीमध्ये माझा दुसरा भाऊ धनराज याच्या फेसबुक पोस्टवर संपर्क क्रमांक त्याला मिळाला. त्याने स्वतःहून काल फोन केला. बारामतीचा मेळावा आटोपून पाच वाजता मी परतताना त्याचा फोन धडकला. मी मुंबईत आहे असे सांगितले. आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये मुंबईकडे निघालो, अशी माहिती अंधारे यांनी दिली.

यानंतर मी आमदार सचिन भाऊ आहिर यांना संपर्क केला. भाऊंनी तात्काळ युवा सेनेच्या सगळ्या टीमला सांगितलं. युवासेना उपसचिव जय सरपोतदार अरुण कांबळे ही मंडळी तात्काळ आपल्या टीम सह येऊन दाखल झाले. राहुल कनाल यांनीही फोनवरून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेणे सुरू ठेवला. शेवटी रात्री दीड वाजता त्याचा शोध लागला, असे अंधारे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube