मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा संशय, 55 जणांची तपासणी, 12 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह

दुसऱ्याच दिवशी या व्हॅनचा वापर करून पहिली मोठी कारवाई करण्यात आल्याने मुंबई पोलिसांच्या या मोहिमेची चर्चा सुरू झाली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 23T135637.503

Suspicion of drugs at a live concert in Mumbai : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात आयोजित करण्यात आलेलया एका लाईव्ह कॉन्सर्टमधे अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या संशयावरून अँटी नार्कोटिक्स सेलने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स व्हॅनच्या माध्यमातून तब्बल 55 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 12 जणांची प्राथमिक ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अत्याधुनिक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी या व्हॅनचा वापर करून पहिली मोठी कारवाई करण्यात आल्याने मुंबई पोलिसांच्या या मोहिमेची चर्चा सुरू झाली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात सुरू असलेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचा वापर होत असल्याचा संशय पोलिसांना होता. या पार्श्वभूमीवर अँटी नार्कोटिक्स सेलच्या पथकाने कार्यक्रमस्थळी विशेष तपासणी मोहीम राबवली. यासाठी नव्याने दाखल करण्यात आलेल्या अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स व्हॅनचा वापर करण्यात आला. या व्हॅनमधील विशेष तपासणी यंत्रणेच्या मदतीने कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्या 55 जणांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. यापैकी 12 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोठ्या संगीत कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात! पोलो कार-ट्रकच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

प्राथमिक ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या सर्व 12 जणांना पुढील तपासासाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यानंतर ताडदेव पोलिसांनी या सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. आता वैद्यकीय तपासणीचे अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह येणे म्हणजे अमली पदार्थांचे सेवन कायदेशीररीत्या सिद्ध होणे नव्हे. त्यामुळे वैद्यकीय अहवाल आणि तपासातील निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत. या प्रकरणात संबंधित व्यक्तींनी नेमक्या कोणत्या प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन केले होते, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण कारवाईचे विशेष महत्त्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स व्हॅनचा प्रत्यक्ष वापर उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी करण्यात आला. या व्हॅनच्या माध्यमातून करण्यात आलेली ही पहिली मोठी कारवाई ठरली आहे. सार्वजनिक कार्यक्रम, संगीत महोत्सव, कॉन्सर्ट आणि गर्दीच्या ठिकाणी अमली पदार्थांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा अत्याधुनिक यंत्रणेचा उपयोग होणार आहे. त्यामुळे मुंबईतील मोठ्या कार्यक्रमांमध्ये आता पोलिसांची नजर अधिक सतर्क राहणार आहे. दरम्यान, महालक्ष्मी रेसकोर्समधील या कारवाईनंतर मुंबईत अमली पदार्थांविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us