live now
Vidhan Parishad Result : शिक्षक, पदवीधरची रणधुमाळी! 5 जागांवर कोण मारणार बाजी…
Vidhan Parishad Result : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतमोजणी सुरु झाली आहे.
Vidhan Parishad Result : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर अखेर आज मतमोजणी पार पडणार आहे. अर्थात विधान परिषदेच्या 5 जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. या निवडणुकीत महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं असून नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद या मतदारसंघांमधील लढतींमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पहा लाईव्ह अपडेट
LIVE NEWS & UPDATES
-
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढत; 30 उमेदवार निवडणूक रिंगणात
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत एकूण 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे...
- 61 हजार 940 मतदारांपैकी 53 हजार 185 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
- एकूण 85.87 टक्के मतदानाची नोंद
2020 च्या निवडणुकीतील 58.43 टक्क्यांच्या तुलनेत यंदा मतदानात वाढ
-
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात
अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.

-
माझे भाऊ अनिल बोंडे यांचा मला आशीर्वाद , भाजपच्या बंडखोर संगीता शिंदे यांची प्रतिक्रिया
माझे भाऊ अनिल बोंडे यांचा मला आशीर्वाद , भाजपच्या बंडखोर संगीता शिंदे यांची प्रतिक्रिया
Sangita Shinde : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू होत आहे. त्यासाठी भाजपच्या बंडखोर उमेदवार आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे या अमरावती येथील लोकशाही भवनमध्ये दाखल झाल्या आहेत. ‘माझे भाऊ अनिल बोंडे यांचा मला आशीर्वाद आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे...
-
शिक्षक मतदार संघासाठी काँग्रेस उमेदवार जयंत आजगावकर यांनी घेतला ऑब्जेक्शन
शिक्षक मतदार संघासाठी काँग्रेस उमेदवार जयंत आजगावकर यांनी घेतला ऑब्जेक्शननिवडणूक अधिकारी आरे रवी करत असल्याचा जयंत आजगावकर सगावकर यांचा आरोप..
आतमधली सीसीटीव्ही आणि कॅमेरे बंद असल्याचा आरोप ..
आतमध्ये कागद आणि पेन आणू दिले जात नाही ..
गाडीच्या किल्ल्या , पाकीट, सर्व काढून घेत आहे, निवडणूक अधिकारी हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप ..
-
पुणे पदवीधर मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात
पुणे पदवीधर मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात
मतपत्रिकांचे 50-50 चे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू
या प्रकीयेला अंदाजे 4 वाजतील
त्या नंतर पात्र, अपात्र मतपत्रिकांचं वर्गीकरण केले जाणार
वर्गीकरण केल्यानंतर पात्र मतपत्रिकाच्या नुसार विजयासाठीचा कोटा निश्चित केला जाणार
कोटा निश्चितीनंतर मतपत्रिकांचं उमेदवार निहाय वर्गीकरण होणार
त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात होणार…