कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू, लसणाने आणले चेहऱ्यावर हसू

  • Written By: Published:
कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू, लसणाने आणले चेहऱ्यावर हसू

यंदा देशाबरोबर राज्यात देखील लसणाचे दर प्रथमच 10000 रुपये क्विंटलच्या पार गेले आहेत. यामुळे लसूण उत्पादक शेतकरी आनंदी आहे. आज अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावरान लसणाला 7200 रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक भाव मिळाला. हा भाव जळगाव नंतर राज्यातील सर्वाधिक दर आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावरान लसणाला 5000 ते 7200 या दरम्यान भाव मिळाला. तर जळगावमध्ये गावरान लसणाला 9000 ते 15000 रुपये क्विंटल दर मिळाला. हा देशातला सर्वाधिक भाव होता‌. एकीकडे शेतकऱ्यांना कांद्याने रडवले आहे तर लसणाला मिळालेल्या उचांकी भावामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये देखील आज लसणाला सरासरी 4000 ते 6500 या दरम्यान भाव मिळाला, यामध्ये पुणे बाजार समितीमध्ये 6500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तसेच नागपूर बाजार समितीत 6000 रुपये सरासरी भाव मिळाला. जाणकारांच्या मते यंदा लसणाचे उत्पादन घटल्याने लसणाचे भाव वाढले आहेत. सर्वच शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळल्याने लसणाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे लसणाची चांदी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राजस्थानमधील कृषी अधिकारी पिंटू पहाडी सांगतात, “गेल्या तीन वर्षांपासून लसणाचे भाव स्थिर होते. त्यामुळे लसूण उत्पादक शेतकरी चिंतेत होता‌. यंदा सर्वांधिक लसूण उत्पादक राज्य असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात राज्यातील लसूण उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र दिसून येत असले तरी येत्या हंगामात लसणाची लागवडीत वाढ होईल, परिणामी लसणाचे भाव कोसळतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे अर्थशास्त्र लक्षात घेऊन विविध पीकपद्धतीचा अवलंब करावा.”

राजकीय टीकेनंतर ‘वर्षा’ अन् ‘सागर’ बंगल्यावरील खर्चावर मर्यादा… 

परंतु महाराष्ट्रात लसणाच्या उद्पादनात गेल्या दोन – तीन वर्षांपासून लसणाचे उत्पादन झालेली घट पाहता राज्यात अजून तरी काही काळ लसणाचे भाव जास्तच राहतील असे जाणकार सांगतात.

राज्यात नाशिक, सोलापूर, पुणे या बाजारपेठा लसणाला योग्य भाव मिळत असतो. राजगुरुनगरच्या कांदा लसूण संशोधन केंद्राचे माध्यमातून लसूण लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाते.

भारतातून अनेक वर्षांपासून लसणाची अरब राष्ट्र व युरोपीय देशांत निर्यात केली जाते. केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या आकडेवारीनुसार 2022-23 या काळात देशातून एकूण 4,489.90 टन लसूण निर्यात झाला आहे. भारतीय लसूण चवीला तिखट आहे. आणि तो मांसाहारी अधिक वापरला जातो.त्यामुळे अरब राष्ट्रे व शेजारील बांगलादेशात भारतीय लसणाला अधिक पसंती दिली जात आहे‌.

लसणाच्या ‘जामनगर’, ‘नाशिक’, ‘महाबळेश्वर’, ‘मदुराई’, ‘हिस्सार’ अशा स्थानिक जाती आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाने ‘गोदावरी’, ‘श्वेता’, ‘फुले निलिमा’, ‘फुले बसवंत’ अशा काही सुधारिती जाती विकसित केल्या आहेत‌. राजगुरुनगर येथील कांदा -लसूण केंद्र संशोधन केंद्र हे देशातील एकमेव कांदा आणि लसूण केंद्र समजले जाते. या केंद्राच्या माध्यमातून लसणाच्या विविध प्रजातींवर काम सुरू आहे. या केंद्राने ‘भीमा ओंकार’ व ‘भीमा पर्पल’ या दोन जाती विकसित केल्या आहेत. महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ५हजार हेक्टर क्षेत्र हेक्टर क्षेत्रावर लसणाची लागवड होत असते. यामध्ये पुणे, नाशिक , धुळे, नगर, जळगाव आणि जळगाव हे लसूण उत्पादक जिल्हे समजले जातात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube