वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय नाही तर आयुक्तच दिल्लीला जाणार; फडणवीसांची सारवासारव

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय नाही तर आयुक्तच दिल्लीला जाणार; फडणवीसांची सारवासारव

मुंबई : भाजपकडून (Bjp)महाराष्ट्राचं (Maharashtra)महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच मुंबईमधील (Mumbai)वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय (Office of Textile Commissioner)दिल्लीला (Delhi) हलवण्याचा डाव भाजपकडून केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नेत्यांकडून करण्यात येतोय. आज राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जयंत पाटील (Jayant Patil)यांनी थेट विधासभेत हा प्रश्न विचारला आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी उत्तर दिले आहे. फडणवीसांनी यावेळी सांगितले की, मुंबईमधील वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीला जाणार नाही, मात्र वस्त्रोद्योग आयुक्त आणि काही अधिकारी दिल्ली मुख्यालयात काही दिवस काम करणार आहेत.

यावेळी फडणवीस म्हणाले की, मुंबईमधील वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. या ऑफिसमध्ये जवळजवळ पाचशेचा स्टाफ आहे. फक्त वस्त्रोद्योग आयुक्त आणि पाच अधिकाऱ्यांना दिल्लीमधील मुख्यालयात काही दिवस काम करायला सांगितलं आहे.

राष्ट्रवादीने घेरलेल्या भुसेंच्या मदतीला शंभूराज देसाई; राऊतांनाही दिले चॅलेंज..

वस्त्रोद्योग मंत्रालयाची पुनर्बांधणी आणि सक्षमीकरण तसेच वस्त्रोद्योग उद्योगाला काही सवलतीच्या योजना फ्रेम करण्यासाठी त्यांना काही दिवस दिल्लीमध्ये काम करण्यास सांगितले आहे. मुंबईमधील वस्त्रोद्योगाचे कार्यालय हलवण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

यापूर्वीही ठाकरे गटाच्या आमदारांकडून त्यातल्या त्यात भास्कर जाधव यांच्याकडून मुंबईमधील वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीला नेण्याचा डाव हाणून पाडावा लागेल असा इशारा दिला होता. त्याचबरोबर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील ट्वीटच्या माध्यमातून आरोप केला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत उत्तर दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube