शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार? सत्तासंघर्षावर आज सुनावणी

Eknath Shinde and Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. या सत्तासंघर्षांवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, महेश जेठमलानी हे युक्तिवाद सादर करत आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. कोर्टाकडून येणाऱ्या या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे.

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह आपला वेगळा गट निर्माण केला. यामुळे शिवसेनेत दुफळी निर्माण होऊन शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. शिवसेना आपलीच यासाठी दोन्ही गटाकडून रस्सीखेच सुरु झाली. यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. दरम्यान काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह व नाव हे दोन्ही शिंदे गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या या निकालाने ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला. त्यांनतर ठाकरे गटाने आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहे.

पेन्शनचे टेन्शन…राज्य सरकारचे 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर

दरम्यान राज्यातील सत्तासंघर्षावर आज मंगळवारी (दि. 14) पुन्हा सुनावणी होणार आहे. पुढील दोन दिवस ही सुनावणी चालू राहणार आहे. शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद केल्यानंतर ठाकरे गटाकडून त्याचे प्रत्युत्तर सादर केले जाईल. अशात या महिन्यात सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण होऊन निकाल येण्याची शक्यता आहे. घटनापीठ दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर काय निकाल सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sheetal Mhatre : व्हायरल व्हिडीओप्रकरणी आदित्य ठाकरेंना धक्का

Tags

follow us