BSNL Chamber : निगडीत चेंबरमध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा मृत्यू
BSNL Chamber : पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथील बीएसएनएलच्या भूमिगत चेंबरमध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला.
BSNL Chamber : पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथील बीएसएनएलच्या भूमिगत चेंबरमध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. मागील वर्षी याच परिसरात अशी दुर्घटना घडली होती.
मनोज बाबुराव शिंदे (वय 26, रा. नाशिक जेल रोड, मूळ रा. सिद्धेश्वर, ता. औंढा, जि. हिंगोली) आणि अमोल अशोक शिंदे (वय 20, मूळ रा. सिद्धेश्वर, ता. औंढा, जि. हिंगोली) अशी मृतांची नावे आहेत. हे दोन तरुण चेंबरमध्ये (Pimpri-Chinchwad) काही काम करण्यासाठी उतरले होते. दरम्यान त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.दरम्यान, मागील वर्ष याच ठिकाणी अशाच स्वरूपाची दुर्घटना घडली होती. त्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
23,733 फूट उंच पर्वतावरून कोसळला बर्फाचा महाकाय तुकडा; नेपाळमध्ये महाप्रलयाची Inside Story-
तर दुसरीकडे मध्यरात्रीच्या वेळी कोणत्याही पुरेशा सुरक्षाव्यवस्थेशिवाय कामगारांना चेंबरमध्ये उतरवण्यात आलेच कसे? तसेच ऑक्सिजनची उपलब्धता, गॅस तपासणी, सुरक्षा उपकरणे, दोरखंड आणि इतर आवश्यक उपयोजना करण्यात आल्या ? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कामगार संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी चेंबरची तपासणी, सुरक्षा नियमांची आणि कामगारांना आवश्यक प्रशिक्षण आणि सुरक्षा साधन उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी देखील संघटनेकडून करण्यात येत आहे.
मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा; तीन ठिकाणी SVKM करणार विकास-