जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस तर्फे सशस्त्र सेना ध्वज दिनी विद्यार्थ्यांची अनोखी मानवंदना; 60 बाय 40 फूट ध्वजांची प्रतिकृती
भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजऱ्या करण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वज दिनी विद्यार्थ्यांची अनोखी मानवंदना.
Unique salute by students on Armed Forces Flag Day : भारताचा राष्ट्रध्वज तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजांची भव्य प्रतिकृती नर्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस तर्फे साकारण्यात आली. भारत माता की जयच्या जयघोषात भारतीय लष्कर(Army), नौदल(Navy) आणि हवाई(Air Force) दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजऱ्या करण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वज दिनी ही अनोखी मानवंदना देण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तब्बल 60 बाय 40 फूट आकारामध्ये हे ध्वज साकारण्यात आले होते. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन भारतात दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशाच्या सीमांचे रक्षण तिन्ही सैन्य करतात. भारतीय लष्कर ध्वज दिन प्रत्यक्षात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो.
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका; 400 कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार?
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, सशस्त्र सेना ध्वज दिवस हा भारताच्या (India) प्रत्येक सैनिकाचा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. भारतीय सशस्त्र दलातील जवानांच्या कल्याणासाठी भारतातील लोकांकडून निधी गोळा करण्यासाठी समर्पित करण्यात आलेला दिवस आहे. त्यामुळे या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सैनिकांना अनोखी मानवंदना दिली आहे.
