विदर्भाला अवकाळीचा तडाखा; हातातोंडाशी आलेलं पिक गेलं, शेतकरी मेटाकुटीला…
पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
Unseasonable Rain : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काल पश्चिम विदर्भात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonable Rain ) विदर्भातील शेतकऱ्यांवर अक्षरश: रडण्याची वेळी आलीयं. पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मोताळा, खामगाव, संग्रामपूर भागात जोरदार अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पिकं गेल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलायं.
रोहिणी खडसे खरात प्रकरणावर संतापल्या! ‘समन्स देऊन उपयोग नाही, थेट अटकेशिवाय सत्य बाहेर येणार नाही’
29 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतरत काल 30 मार्च रोजी विदर्भातील बुलढाणा, चिखली मोताळा, खामगाव, संग्रामपूर भागात पावसाने हजेरी लावलीयं. या पावसामुळे शेतात काढणीला आलेलं बऱ्यापैकी पिक शेतकऱ्याच्या हातातून गेल्याचं चित्र आहे. काढणीला आलेला कांदा संपूर्ण भिजल्याने आता या मालाला भाव मिळेल की नाही? या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहे. काल झालेल्या पावसामुळे विशेषत: कांदा, केळी, गहू, ज्वारी, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
अधिकाऱ्यांचे वाईफ स्वॅपिंग अन्… वडेट्टीवारांचे दावे तर पुरावे द्या म्हणत बावनकुळे भडकले
पुढील तीन ते चार दिवसही जोरदार पावसाचा इशारा…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात बदल होत असल्याने काल अनेक ठिकाणी पावसासह गारपीटीची नोंद झालीयं. या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं. सध्या उत्तर भारताच्या अनेक भागात पाऊस कोसळत असून या भागांना पावसाचा इशारा देण्यात आलायं. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरुन येणारे वारे तसेच पश्चिमी विक्षोभ या काही नैसर्गिक कारणांमुळे राज्यात मंगळवारपासून पुढील दोन ते तीन दिवस, विशेषत: राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.
अकोला महानगरपालिकेत गदारोळ ! महापौरांकडून 16 नगरसेवक तडकाफडकी निलंबित
मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अधिक प्रभाव असणार आहे. त्यामुळे या भागातील अनेक जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणमध्ये मुंबई पालघर वगळून इतर भागांनाही इशारा देण्यात आलायं. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांना यलो अलर्ट देण्यात आला असून आज पावसाची अधिक ची तीव्रता अधिक असेल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.