आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण; भाषेवरून जरांगे पाटलांना विनोद पाटलांचा सल्ला

महिला जिल्हाधिकाऱ्यांसोबत मराठा समाजाचा कोणताही वाद नसून महिलांचा सन्मान आणि संरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी आहे

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 02T192625.344

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा (Jarange) वारसा सांगणाऱ्या मराठा समाजाने महिलांचा सन्मान राखला पाहिजे, अशी भूमिका मराठा आरक्षण अभ्यासक विनोद पाटील यांनी मांडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस असून, त्यांच्या वक्तव्यांमधील भाषेवरून पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मानाने परतावा करणारी परंपरा आपली असल्याचे सांगत चुकीची भाषा वापरली गेली असेल तर ती चुकीचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

महिला दंडाधिकारी असो किंवा कोणतीही महिला असो, तिच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे योग्य नाही, असे विनोद पाटील यांनी म्हटलं. जरांगे सलग चार दिवस उपाशी असल्याने चिडचिड होणे स्वाभाविक असले तरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आंदोलन सुरू असल्याने प्रत्येक वक्तव्य करताना जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित होऊ नये, यासाठी भाषेची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केलं.

Video : जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे मसुदा दिलाय, मंत्री विखे पाटील यांनी आकडेवारीच मांडली

महिला जिल्हाधिकाऱ्यांसोबत मराठा समाजाचा कोणताही वाद नसून महिलांचा सन्मान आणि संरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केलं. मंचावर काही शब्दांचा प्रयोग झाला असला तरी तो जिल्हाधिकारी महिलेच्या उद्देशाने नव्हता, असा खुलासा करत गैरसमज करून घेऊ नये, अशी विनंती त्यांनी केली. कोणत्याही अधिकाऱ्याच्या विरोधात मराठा समाज नसल्याचे सांगत जरांगे यांनी यापुढे संयमित आणि योग्य भाषेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत असल्याची चर्चा सुरू असताना त्यावरही विनोद पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून मराठा समाजाशी त्यांचे अतूट नाते आहे, त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्याचा प्रश्नच येत नाही, असे पाटील यांनी सांगितलं. शिंदे यांचा आम्ही सन्मान करतो आणि मराठा समाज त्यांच्याविरोधात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

Tags

follow us