आरक्षणाची गुगली अन् सत्तेचं समीकरण! राज्यातील 29 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत…

नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 29 महापालिकेत महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

Untitle (5)

Mayor Reservation Muncipal Corporation : राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौर पदासाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्यातील 29 महापालिकांमध्ये आरक्षणाच्या गुगलीवर सत्तेची समीकरणे ठरणार आहेत.

पेन्शनधारकांना 2030 सालापर्यंत मिळत राहणार पैसे; नेमका काय आहे सरकारचा निर्णय?

महापौरपदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ही आरक्षण सोडत असणार आहे. या सोडतीनंतर महापौरपद आरक्षित आहे की नाही? हे स्पष्ट होणार आहे. याआधीचे काढण्यात आलेले आरक्षण बाजूला ठेवण्यात येणार असून चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला आहे.

अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल; डीजीपी रामचंद्र रावला केलं निलंबित

राज्यातील 29 महापालिकांच्या आरक्षण सोडतीत सुरुवातीलाच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सोडत काढण्यात येणार आहे. तसेच यामध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असणार आहे.

यामध्ये राज्यातील मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी-निजामपूर, पनवेल, नाशिक, लातूर, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, पिंपरी-चिंचवड, पुणे, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नागपूर, जळगाव, धुळे, मालेगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांतील महापालिकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

प्रभादेवीतील पराभवानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण; समाधान सरवणकरांचे भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप

दरम्यान, राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी पार पडला. या निकालामध्ये भाजप-शिवसेना महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचं दिसून आलं. राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाचाच दबदबा असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. तर मुंबईत महापौरपदावरुन महायुतीच्या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता मुंबईत कोणत्या पक्षाचा महापौर होईल याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.

follow us