Sayaji Shinde : झाडाचा शंभरवा वाढदिवस धुमधडाक्यात झाला साजरा..!

  • Written By: Published:
Untitled Design (4)

सातारा : पुण्यातील हडपसर परिसरातील वडाच्या झाडाला साताऱ्यात मागील वर्षी पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात आलं होतं. परंतु यावर्षी त्याच झाडाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात आलेल्या झाडाचा हा पहिला वाढदिवस आहे.

झाडाचा शंभरवा वाढदिवस धुमधडाक्यात झाला साजरा..!

झाडाचा शंभरवा वाढदिवस धुमधडाक्यात झाला साजरा..!

साताऱ्यातील जैवविविधता उद्यानात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वतीने तसेच ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अनोखी मानवंदना देण्यात आली. या अनोख्या सोहळ्यात सातारा आणि परिसरातील निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते.

सुमारे शंभर वर्ष जुन्या पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात ‘सह्याद्री देवराई ‘ संस्थेला एक वर्षांपूर्वी यश आलं आहे. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून प्रजासत्ताकदिनी या राष्ट्रीय वृक्षाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

झाडाचा शंभरवा वाढदिवस धुमधडाक्यात झाला साजरा

झाडाचा शंभरवा वाढदिवस धुमधडाक्यात झाला साजरा

Tags

follow us