Ahmednagar : लाखो रुपयांची रोकडं अन् दागिणे घेऊन प्रियकरासोबत काढला पळ

Ahmednagar : लाखो रुपयांची रोकडं अन् दागिणे घेऊन प्रियकरासोबत काढला पळ

आजकाल लोक प्रेमात काहीही करायला तयार असतात. प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात. अशाच आंधळ्या प्रेमाची प्रचिती नुकतीच एका घटनेमुळं पाथर्डीकरांना आली. शहरातील एका खासगी वित्तीय संस्थेत काम करणाऱ्या एका तरुणीने संस्थेतील 38 लाखांची रोकड व 12 तोळे सोने घेऊन प्रियकरासोबत पळ काढला. या घटनेची तक्रार संस्थेच्या मालकाने करणं अपेक्षित असताना मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील वित्तीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. (With 12 tolas of gold and 38 lakhs in cash, the young woman eloped with her lover)

गेल्या काही वर्षांत शहरासह तालुक्यात अनेक खासगी वित्तीय संस्थांचे मोठं जाळं निर्माण झाले आहे. जास्त व्याज मिळत असल्याने अनेकांनी या वित्तीय संस्थांमध्ये लाखोंच्या ठेवी ठेवल्या आहेत. तात्काळ सोने तारण कर्ज मिळत असल्याने काही लोकांनी सोनेही तारण ठेवले आहे. अशाच शहरातील एका आर्थिक संस्थेत अनेकांची ये-जा असायची. अनेक ठेवीदारांनी आपल्या ठेवी या संस्थेत ठेवल्या होत्या. एक 20 वर्षीय तरुणी या आर्थिक संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करत होती.

Delhi Murder Case : ‘लव्ह जिहाद’ असो नाहीतर ‘एकतर्फी प्रेम’ आरोपीला कठोर शिक्षाच, पोलिस आयुक्तांची ग्वाही

शहरातील या वित्तीय संस्थेत काम करत असतांना ही तरूणी एका तरुणाच्या प्रेमात पडली. प्रेमात आंधळ्या झालेल्या या युवतीने ठेवीदारांनी ठेवलेले पैशांवरच डल्ला मारला. तब्बल 38 लाख 34 हजार रुपये रोख आणि बारा तोळे सोने घेऊन या तरुणीने प्रियकरासोब धूम ठोकली. संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या युवतीच्या या कारनाम्यामुळं संस्था मालक हतबल झाला आहे. दरम्यान, मुलगी पैसे आणि दागिने घेऊन बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली असून पोलिस त्या तरुणीचा शोध घेत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube