शिवसेना कोणाची? आज होणार सुनावणी

शिवसेना कोणाची? आज होणार सुनावणी

मुंबई : खरी शिवसेना कुणाची? शिंदे की ठाकरे कोणाला धनुष्यबाण मिळणार? याबाबत आज म्हणजेच १७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. दुपारी ४ वाजता निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता त्यावर काय निर्णय होतो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंड करत शिवसेनेतून बाहेर पडले. यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आले. त्यांनतर शिवसेना आमचीच आहे असा दावाही शिंदे यांनी केला. तर उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना आमचीच आहे असा दावा केला आहे.

दरम्यान दोन्ही नेत्यांकडून पक्ष चिन्हावर दावा करण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले असून शिवसेना नेमकी कुणाची यावर निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू आहे.

दरम्यान ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. तर दुसरीकडे अँड मनिंदर हे कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढतील. दोन्ही बाजूचा युक्तीवाद जर पूर्ण झाला तर रात्री उशिरा निवडणूक आयोग आपला निर्णय देईल. अन्यथा सुनावणीची पुढील तारीख देईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube