वाळू माफियांना महसूल विभागाची चपराक; अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना होणार रद्द
अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने आता कठोर पावली उचलली जाणार आहेत. वाहनांवर प्रशासनाची करडी नजर.
illegal transportation of minor minrals sud :
राज्यात मोठ्या प्रमाणात आणि सर्रासपणे वाळू आणि बाकी गौण खनिजांची चोरी केली जात होती. ज्यामुळे गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच रस्ते अपघात, पर्यावरणाची हानी आणि महत्वाचं म्हणजे यामुळे शासनाचा महसूल देखील मोठ्या प्रमाणात बुडत होता. येथून मागे बघितलं तर यांच्यावर कारवाई करायला गेलेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले या लोकांकडून केले जात होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून गौण खनिजाच्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने आता कठोर पावली उचलली जाणार आहेत.
आजपासून निश्चित केलेल्या नवीन नियमानुसार गौण खनिजाची (minor minrals sud) अवैध वाहतूक (illegle transportation) आणि उत्खनन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 86 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. या कारवाईत पहिल्यांदा जर तुमचे वाहन पकडले तर 30 दिवसांसाठी तुमचा परवाना रद्द केला जाणार असून वाहन जप्त केले जाणारा आहे. पहिल्यांदा कारवाई झाली असून देखील पुन्हा तुमचे वाहन त्याच गुन्ह्यात दुसऱ्यांदा पकडले तर तुमच्या वाहनाचा परवाना हा 60 दिवसांसाठी रद्द केला जाईल आणि वाहन देखील जप्त केले जाणार आहे. दोनदा झालेल्या कारवाईनंतर देखील तुम्ही पुन्हा तोच गुन्हा केला तर गुन्ह्यासाठी वापरलेल्या वाहनाचा परवाना कायमस्वरूपीसाठी रद्द केसात येईल आणि वाहन देखील पुढील कारवाईसाठी जप्त करण्यात येईल.
मलेशियाकडचं चक्रीवादळ बंगालच्या उपसागराकडं सरकतय, हवामान विभागाचा महत्वाचा इशारा
विशेष करून अवैध वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. ज्यात ड्रिल मशीन, जेसीबी, पोकलँड, ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक, डंपर यांसारख्या सगळ्याच वाहनांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. शासनाचा महसूल चुकवणे म्हणजे शासनाची फसवणूक करणे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि काही लोकं जाणीवपूर्वक शासनाला फसवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर अंकुश राहावा यासाठी महसूलमंत्र्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. त्यामुळे महसूल विभागाच्या यंत्रणेने सजग राहून अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांची माहिती परिवहन विभागाला द्यावी. जेणेकरून तात्काळ या प्रकारावर कारवाई होईल आणि त्याला आळा बसेल.
