लालबागच्या राजाच्या चरणी 6 कोटी 11 लाखांची देणगी; सोने-चांदीच्या वस्तूंचा उद्या लिलाव

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या मंडपात तसेच दर्शनाच्या विविध रांगांमध्ये ठेवण्यात आलेल्या देणगी पेट्यांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम अर्पण केली.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Lalbagh Raja

Lalbaugcha Raja : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा (Lalbaugcha Raja) राजा चरणी भाविकांनी भरभरून दान अर्पण केलीय. यंदाच्या गणेशोत्सवात (Ganesh festival 2026) भाविकांकडून तब्बल 6 कोटी 11 लाख 96 हजार 500 रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. मंडळाने गणेशोत्सवातील देणगीची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे.


बारामतीतील दुहेरी हत्येने खळबळ; ‘वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणा’, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लालबागच्या राजाच्या मंडपात तसेच दर्शनाच्या विविध रांगांमध्ये ठेवण्यात आलेल्या देणगी पेट्यांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम अर्पण केली. याशिवाय विसर्जनाच्या दिवशीही देणगी जमा झाली आहे. 14 ते 28 सप्टेंबरदरम्यान मंडपातील देणगी पेट्यांमध्ये 3 कोटी 53 लाख 42 हजार रुपये जमा झाले. तर चरणस्पर्श आणि मुखदर्शनाच्या रांगांमध्ये ठेवलेल्या देणगी पेट्यांमधून 2 कोटी 42 लाख 40 हजार रुपये प्राप्त झाले. विसर्जनाच्या दिवशी ठेवलेल्या देणगी पेटीतून आणखी 16 लाख 14 हजार 500 रुपये झाले झाले. अशा प्रकारे एकूण देणगीची रक्कम 6 कोटी 11 लाख 96 हजार 500 रुपये इतकी झाली आहे.


‘ज्ञानेश कुमार नव्हे, त्यांच्या बॉसच्या राजीनाम्याची मागणी करा’; अरविंद केजरीवालांचा कॉक्रोच जनता पार्टीला सल्ला


सोने-चांदीच्या वस्तूंचा उद्या लिलाव

दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदीचे दागिने, विविध वस्तू तसेच दोन मोटारसायकलींचा सार्वजनिक लिलाव करण्याची घोषणा मंडळाने केली आहे. हा लिलाव बुधवारी ( 30 सप्टेंबर) रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत लालबाग मार्केट येथे होणार आहे. या लिलावात भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. लिलावातील वस्तूंची माहिती प्रक्रियेदरम्यान घटनास्थळी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी आणि खजिनदार मंगेश दळवी यांनी लिलावाची घोषणा केली.

follow us