सरकारने मराठी तरूणापर्यंत नोकरीची माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे; राज ठाकरेंची भूमिका

  • Written By: Published:
मोठी बातमी! अखेर कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार, भाजपाच्या प्रयत्नांना यश

पुणे : मराठी तरुण नोकरी करत नाही किंवा त्यांना अटी सांगून काम करायची सवय आहे, अशी परिस्थिती नाही. पण मराठी तरुणांना याची माहिती नसते. ती मराठी तरुणांपर्यंत पोहचवायला हवी. अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. राज ठाकरे पुण्यात सुरू असलेल्या १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सरकारचे एखादे डिपार्टमेंट असायला हवे. ज्याच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना कुठे, कोणत्या प्रकारच्या नोकरी उपलब्ध आहेत. याची माहिती या डिपार्टमेंटच्या माध्यमातून दिली पाहिजे. असं मत त्यांनी व्यक्त केले.

 

Tags

follow us