प्रफुल्ल साळुंखे : रोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक मंत्रालयात येत असतात . यात अनेक जण विविध कामे आणि तक्रारी बाबत चकरा मारतात . रोजच मंत्री भेटतील असे नाही. त्यातही मंत्रालयात प्रवेश करण्याची पद्धत अतिशय किचकट आहे. मंत्रालयात प्रवेश घ्यायचा असेल तर दुपारी दोन नंतर प्रवेश मिळतो. शेकडो लोक विशेषत: सोमवार, मंगळावर, बुधवार या दिवशी ही संख्या हजारावर जाते.
कारण या दिवशी बहुतांश मंत्री मंत्रालयात असतात. कॅबिनेट असेल तर मुख्यमंत्री, उपमुखमंत्री यांचीही भेट होते. म्हणून या दिवशी तासनतास लोक रांगेत उभे राहतात. अनेक नागरिक मुंबई पासून लांब अंतराच्या गाव शहारतून आलेले असतात. त्यांना संध्याकाळी परत जायचे असते. काही मुंबईत थांबतात पण राहायची सोय होत नाही मिळेल त्या ठिकाणी रात्र काढतात.
आता मंत्रलयात हे सर्व कालबाह्य होणार आहे. नागरिकांचे टपाल , अर्ज आणि तक्रारी स्वीकारण्यासाठी भव्य असं टपाल केंद्र उभे करण्यात आले आहे. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे टपाल केंद्र असेल. या टपाल केंद्रात प्रत्येक विभागानुसार खिडकी ठेवण्यात आली आहे. म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय खिडकी क्रमांक १,२ ३ असेल. त्यानंतर खिडकी क्रमांक ४,५,६ हे उपमुखमंत्री कार्यालयाचे टपाल खिडकी असेल. अशाच प्रमाणे ग्रामविकास, महसूल नगरविकास , गृह अशा प्रत्येक विभागाच्या एक किंवा दोन खिडकी ठेवण्यात आली आहे.
सकाळी अकरा वाजता या खिडकीवर टपाल स्वीकारले जाईल. दुपारी साडेचार वाजेपर्यंत टपाल स्वीकारले जाईल. प्रत्येक विभागाचे स्वतंत्र दोन कर्मचारी हे काम करतील. टपाल घेणे, नोंद कारणे, त्याची पोच पावती देणे, आलेले टपाल संध्याकाळी संबंधित कार्यालयात जमा करणे अशी कामे हा टपाल विभाग करणार आहे. टपाल विभागात दिलेली पोचपावती किंवा नंबर हा फाईल नंबर म्हणून नोंद राहिल. सध्या ती फाईल कुठे आहे. हे ट्रॅकिंग केले जाणार आहे.
मी त्याच वेळी बाळासाहेबांना कल्पना दिली होती; राणेंनी उलगडला ठाकरेंचा किस्सा
टपाल कार्यालय हे मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असल्याने प्रवेश पास काढण्याची आवशक्यता नसेल. म्हणजेच मंत्रालयात होणारी अनावश्यक गर्दी देखील टळणार आहे. त्याच बरोबर नागरिकांची गैरसोय टळून वेळेची बचत होणार आहे.