सोबत आला, ठाकरेंना भिडला… आता थेट राज्यमंत्र्याचा दर्जा; शिलेदाराला CM शिंदेंचे गिफ्ट

सोबत आला, ठाकरेंना भिडला… आता थेट राज्यमंत्र्याचा दर्जा; शिलेदाराला CM शिंदेंचे गिफ्ट

मुंबई : शिवसेना आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची श्री. सिद्धीविनायक गणपती मंदीर विश्वस्थ व्यवस्था, व्यवस्थापन समितीचे (न्यास) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांची 23 जुलै 2023 रोजी मुदत संपुष्टात आली आहे. त्यानंतर शिंदे सरकराने सरवणकर यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे. याबाबतचे राजपत्र जारी करत हा निर्णय जाहीर केला. (MLA Sada Saravankar appointed as chairman of Siddhivinayak Ganapati Mandir Trust)

सदा सरवणकर हे दादर-माहिमचे शिवसेनेचे आमदार आहेत. गत जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर सोबत येणारे मुंबईतील पहिले आमदार म्हणून सरवणकर यांना ओळखले जाते. त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागले अशी चर्चा होती. मात्र त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आले. त्यानंतर आता शिंदे यांनी सरवणकर यांची श्री. सिद्धीविनायक गणपती मंदीर न्यासचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. या पदाला राज्य शासनाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.

Jitendra Awhad : बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला तेव्हा तटकरेंनी मला दम भरला होता; आव्हाडांचे तटकरेंवर गंभीर आरोप

हवेतील गोळीबाराप्रकरणी सदा सरवणकर चर्चेत :

गतवर्षी गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा झाला होता. त्या राड्यात हवेत गोळीबार केल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत आले होते. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतर सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, या निर्णयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. दादरमध्ये ह्यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आले. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले.

‘सरकारने अनुदानाचा शब्द पाळावा’; विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मुंबईत धडक

हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती! पण… ह्या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय! मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून ह्या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता… पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्रद्वेषाचं बक्षीस दिलं असेल…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube