कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे. आज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पहिल्यांदाच या ठिकाणी जयंती होत आहे. त्यामुळे त्याचा आनंद मोठा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची आज 366 वी जयंती होत असतानाच आजच्या या ठिकाणी अविस्मरणीय सोहळा पार पडत असल्याचा आनंदही वेगळा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आमच्यात नाराज नाही हे सगळं भाजपकडून पेरलं जातंय…

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याचीही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताच उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अनेक लोकांनी संभाजी महाराज यांना हरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या शौर्याविषयी काही इतिहासकारांनी काही वेगळं लिहिलं असेल पण ती वस्तूस्थिती नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी त्याला कळस चढवला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम त्यांनी या ठिकाणी केले आहेत. त्यामुळे त्यांच्या शौर्याच्या आठवणी आपण जतन करणे गरजेचे असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

त्यांनी मुघल साम्राज्याशी लढा दिला, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात 120 लढाया लढले पण त्यांचा कधीही पराभव झाला नाही. भविष्यातील आखणी करुन त्यांनी जगात कुठे नसतील असे जलदुर्ग या ठिकाणी उभारले आहेत. त्यामुळे या ठिकाणी हीच प्रेरणा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या नौदलाच्या झेंड्यावर राजमुद्राला स्थान दिलं असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube