मुंब्रा रेल्वे अपघातानंतर मध्य रेल्वेला उपरती; मुंबईतील लोकल ट्रेनला दरवाजे बसवणार

  • Written By: Published:
Letsupp Image   2025 06 09T113221.821

Closing Doors Will Be Installed In Mumbai’s Local Trains : मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशांचा जीव गेल्यानंतर आता मध्य रेल्वे प्रशासनाला उपरती सुचली आहे. त्याप्रमाणे येथून पुढे ज्या नवीन गाड्या येणार आहेत त्या सर्व गाड्या ऑटोमॅटीक डोअर क्लोजरसोबत येणार असल्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे, अशी माहिती मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लान

मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात झाला. एक गाडी कसाऱ्याकडे जात होती, एक छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जात होती. ट्रेन फास्ट होती. 8 लोक पडले. त्यांना रुग्णालयात नेले. त्यांच्या प्रकृतीची माहिती रुग्णालयाकडून येणार आहे. मध्य रेल्वेने कल्याणपासून कसाऱ्यापासून तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लान केला आहे. तसेच कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या चौथ्या लाईनचाही प्लान केला आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे स्वप्नील नीला यांनी सांगितले.

दोन फास्ट लोकल…रेल्वे रूळावर मृत्यूतांडव कसं झालं? मध्य रेल्वे प्रशासनाने केला मोठा खुलासा

घटनेची चौकशी सुरू

या भीषण अपघातानंतर मुंबईतील लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या घटनेची रेल्वे विभागाने चौकशी सुरू केली असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर दिली आहे. तसेच दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली असल्याचे फडणवीसांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube