जेलमधून सुटल्यानंतर अनिल देशमुखांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, काय केलीये मागणी ?

जेलमधून सुटल्यानंतर अनिल देशमुखांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, काय केलीये मागणी ?

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कापसाच्या दरासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांना पत्र लिहलं आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर देण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. सद्यस्थितीत शासनाने प्रति क्विंटल 6 हजार 380 असा दर निश्चित केला आहे. हा दर खूप कमी असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

सरकारनं जाहीर करण्यात आलेल्या MSP शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यातून शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नाही. यामुळं शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन कापसाच्या दरात वाढ करावी अशी मागणी, अनिल देशमुख यांनी पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. कापसाच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कापसाच्या दरात वाढ होण्याची शेतकरी प्रतिक्षा करत असल्याचे सांगितले आहे.

सध्या महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कापसाच्या दरात सतत घसरण होत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली. यामुळं काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अभ्यासकांच्या माहितीनुसार कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली. यावर्षी देखील मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होईल अशी शक्यता मानली जात आहे.

केंद्र सरकारनं कापसाची किमान आधारभूत किंमत 6 हजार 380 रुपये निश्चित केली. यामुळे एमएसपीला शेतकरी अपुरे किंमत म्हणत आहेत. या रकमेवर कापसाचा खर्च देखील व्यवस्थित निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले. दर कमी असल्याने बाजारात विक्रीकरिता कमी कापूस जात आहे. सध्या 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात आहे. पुढील काही दिवसांत कापसाची मागणी वाढल्यास त्याचे दर सुधारतील, अशी आशा शेतकऱ्यांना लागली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube