सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी पैसे लावायला हवेत; राज ठाकरे नाराज का?

  • Written By: Published:
सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी पैसे लावायला हवेत; राज ठाकरे नाराज का?

पुणेः राज ठाकरे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर का टाकत नाही ?, याचे उत्तर त्यांनी एका प्रकट मुलाखतीत दिले आहे. सोशल मीडियावर काहीही कमेंट येत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी पैसे लावायला हवेत, असे राज ठाकरे म्हणाले.

जागतिक मराठी अकादमी व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनात व्यंगचित्रकार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर व प्रभाकर वाईरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.

व्यंगचित्र कोणी शिकविले यावर राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि वडिलांनी व्यंगचित्र काढण्यासाठी शिकवले आहे. चित्रकलेतील शेवटची पायरी व्यंगचित्राची आहे. नाक, कान, डोळे, त्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय व्यंगचित्र काढता येत नाही. कुठले अवयव कुठे हे कळलं म्हणजे झाले. बाळासाहेब, वडिल, आर. के. लक्ष्मणांना पाहत व्यंगचित्र काढत आलो आहे. जगातील व्यंगचित्रकार पाहत आलो आहे. आम्ही ब्रशनं काम करणारी माणसं आहोत. कॉलेजमध्ये असताना आठ-दहा तास स्केचिंग करत होतो. बाळासाहेबांना सांगितले की जे समोर दिसेल ते काढा. कचरा पेटी बघून मी चित्र काढत होतो, असे ठाकरे म्हणाले.

सोशय मीडियावर व्यंगचित्र का टाकत नाही, यावर ठाकरे म्हणाले, सोशल मीडियावर व्यंगचित्र टाकायला आवडत नाही. वृत्तपत्रात व्यंगचित्र छापून आल्याचा आनंद होतो. सोशल मीडियावर व्यंगचित्र टाकल्यावर काहीही कमेंट येतात. व्यक्त होण्यासाठी पैसे लावले पाहिजे. फुकट बघायचे आणि काही टाकायचे असे सांगत ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला.

कोणाच्या दबावाला घाबरत नाही
सध्या राज ठाकरे व्यंगचित्र काढण्यापासून एकदम थांबले का? यावर उत्तर देताना त्यांनी कोणाच्या दबावला घाबरत नाही, असे सांगितले. भारतात, परदेशात व्यंगचित्र कलेला अवकळा आलेली आहे. मराठी व्यंगचित्रकारांची कमतरता आहे. दिवाळी अंकातच व्यंगचित्र काढले जाते. किती जण मराठी अंक वाचतात. मराठी व्यंगचित्रकारांनी जागतिकदर्जाचे व्यंगचित्र काढले पाहिजे. त्यासाठी अभ्यास केले पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube