ज्यांनी कधी काळी वाचवले प्राण त्याच डॉक्टरांना मारहाण; शिंदेंचे नगरसेवक म्हात्रेंचा भूतकाळ चर्चेत
Shivsena Shinde Corporator Ramesh Mhatre डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक करण्यात आली आहे.
Shivsena Shinde Corporator Ramesh Mhatres Discussion about past event after Doctor Assault Case : डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरणात (Shinde) डोंबिवली येथील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर म्हात्रेंची एक भूतकाळातील घटनाा चांगलीच चर्चेत आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये रुग्णालयातील सर्व बेड पूर्ण भरलेले असल्याने, ऑन-ड्यूटी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी या बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रारीवरून म्हात्रे रूग्णालयात आले होते. असं सांगितलं जात आहे. त्यानंतर तेथे झालेल्या वादामध्ये म्हात्रे यांनी एका डॉक्टर आणि नर्सला मारहाण केली. या घटनेवरून शिंदेंच्या पक्षावर प्रचंड टीका झाली. या प्रकरणात डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवून निषेध आंदोलन सुरु केले होते. विरोधकांनी विधीमंडळात हा मुद्दा चर्चेला आणत कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर रमेश म्हात्रे यांच्यासह तिघांना अखेर विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे.
Ekanth Shinde : खासदारांनंतर आता 12 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ? मिळणार 5 कोटींचा निधी
रमेश पवार, अक्षय कारंडे आणि प्रमोद निकम अशी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांवर सरकारी कामकाजात अडथळा, डॉक्टरांना जीवे मारण्याचा प्रयत्न अशा प्रकराची कलमे लावण्यात आली आहे.
म्हात्रेंच्या भूतकाळातील त्या घटनेची चर्चा
रमेश म्हात्रे यांच्यावर 2008 मध्ये जीवघेणा गोळीबार झाला होता. यावेळी त्यांच्या शर्टच्या खिशामध्ये असलेल्या पेरणी गोळी अडवली पण ती पोटात घुसली. यावेळी मृत्यूशी झुंज देत असलेल्या रमेश म्हात्रे यांच्यावर डोंबिवलीच्या खाजगी रुग्णालयात डॉक्टर मिलिंद शिरोडकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवले होते. तर त्या अगोदरच्या एका घटनेमध्ये देखील एका हल्ल्यामध्ये म्हात्रे यांची किडनी निकामी झाली होती. याच डॉक्टरांनी एक किडनी काढून त्यांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं होतं. त्यामुळे म्हात्रे शिरोडकरांना अक्षरशः दंडवत घालायचे. मात्र आज एका डॉक्टरांनाच मारहाण केल्याच्या प्रकरणात म्हात्रे अडचणीत सापडले आहेत.