पराभवानंतर झिशान सिद्दीकींना मोठा राजकीय दिलासा; राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत संधी

शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि नव्या मतदारवर्गाला आकर्षित करण्यासाठी झिशान सिद्दीकी यांची निवड करण्यात आल्याचं बोललं जातं.

  • Written By: Published:
Untitled Design 55

Zeeshan Siddiqui declared as NCP candidate : राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करत पक्षातील सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय जाहीर केला असून, त्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर या निर्णयाला अधिकच राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच घडलेली बाबा सिद्दीकी यांची बिश्नोई गँगकडून झालेली हत्या राज्याच्या राजकारणात मोठा धक्का मानली गेली.

या पार्श्वभूमीवर झिशान सिद्दीकी यांच्यावर सहानुभूतीची लाट असली, तरी विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास हा केवळ वैयक्तिक पाठिंबा नसून, पक्षाच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग मानला जात आहे. उमेदवारीसाठी पक्षात प्रचंड स्पर्धा होती. सुमारे 80 हून अधिक इच्छुकांची नावे चर्चेत होती, ज्यातून पाच जणांची अंतिम यादी तयार करण्यात आली.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; ओळख प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत आरोपी कळसकरला जामीन मंजूर

पार्थ पवार यांनी विक्रम काकडे यांच्या नावासाठी प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत शेवटी झिशान सिद्दीकी यांच्या नावावर एकमत झालं.
मुंबईतील राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यामुळे शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि नव्या मतदारवर्गाला आकर्षित करण्यासाठी झिशान सिद्दीकी यांची निवड करण्यात आल्याचं बोललं जातं.

झिशान सिद्दीकी हे माजी आमदार असून, त्यांचे बॉलिवूड आणि उच्चभ्रू वर्तुळात मजबूत संपर्क आहेत. विशेषतः युवा आणि शहरी मतदारांमध्ये त्यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फायदा होईल, असा पक्षाचा अंदाज आहे. दरम्यान, या निर्णयामुळे पक्षातील इतर इच्छुक नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता पक्ष नेतृत्वाकडून समन्वय साधण्याची मोठी जबाबदारी असेल.

एकूणच, झिशान सिद्दीकी यांची उमेदवारी ही केवळ एक निवडणूक निर्णय नसून, मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने आखलेली मोठी राजकीय चाल असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

Tags

follow us