मोदी सरकारने अखेर विरोधकांपुढे टेकले गुडघे; संचार साथीची सक्ती मागे घेण्याची घोषणा
केंद्र सरकारने देशात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर "संचार साथी" सायबरसुरक्षा अॅप प्री-इंस्टॉल करणे बंधनकारक करणारा आपला आदेश मागे घेतला
केंद्र सरकारने देशात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर “संचार साथी” सायबरसुरक्षा अॅप प्री-इंस्टॉल करणे बंधनकारक करणारा आपला आदेश मागे घेतला आहे. अॅपलसारख्या कंपन्यांसह सर्व मोबाइल फोन उत्पादकांना देण्यात आलेले आदेश मागे घेण्यात येत असल्याचे एका सरकारी निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून दोन दिवसांपासून याला तीव्र विरोध केला होता. त्यानंतर संचार सक्ती करण्याचे आदेश मागे घेण्यात आले आहेत. सरकारच्या या भूमिकेनंतर मोदी सरकराने विरोधकांपुढे गुडघे टेकल्याचे बोलले जात आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Govt says pre-installation of Sanchar Saathi app on mobile phones not mandatory. pic.twitter.com/gxt9p64LsR
— Press Trust of India (@PTI_News) December 3, 2025
