लोन अॅपचं मायाजाल! कुटुंबासोबत शेवटचा सेल्फी घेतला अन् दोन चिमुरड्यांसह संपवलं जीवन

लोन अॅपचं मायाजाल! कुटुंबासोबत शेवटचा सेल्फी घेतला अन् दोन चिमुरड्यांसह संपवलं जीवन

loan app : आठ वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी आणि नवरा-बायको. लहान पण आनंदी कुटुंब. पण एका छोट्याशा चुकीचा फटका या कुटुंबाला इतका बसला की त्यांना सामूहिक आत्महत्या करावी लागली. भोपाळमधील हे कुटुंब लोन अॅप्सच्या (loan apps) जाळ्यात अडकले होते. यातून बाहेर पडण्यासाठी पतीने खूप प्रयत्न केला, पण कोणताही मार्ग न दिसल्यानं त्याने स्वत:सह कुटूंबाला संपवलं. त्याने आपल्या दोन मुलांना विष पाजले आणि नंतर पत्नीसह आत्महत्या केली. गुरूवारी या दाम्पत्याचे मृतहेत घरात लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांना घटस्थाळवरून 4 पानांची सुसाइड नोट सापडली. (A couple with two small children ended their lives after falling into the trap of loan app)

https://www.youtube.com/watch?v=7OFhLrR3w8k

भूपेंद्र विश्वकर्मा (वय 38, रा. शिव विहार कॉलनी, रतीबाद) यांना कोलंबिया येथील एका कंपनीत ऑनलाइन नोकरी करायचे. भूपेंद्र यांच्यावर कामाचा ताण आणि कर्ज होते. कंपनीने त्याचा लॅपटॉप हॅक केला आणि त्यातील व्हिडिओ एडीट करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळं व्यथित होऊन भूपेंद्रने पत्नी रितू (35) यांच्यासह आत्महत्या केली. तर याआधी ऋतुराज (3) आणि ऋषिराज (9) किंवा दोन्ही मुलांना विष दिले.

काय लिहिलं सुसाईडनोटमध्ये?
‘काय करावं समजत नाहीये. आमच्या कुटुंबाला कोणाची नजर लागली, माहिती नाही. आम्ही आमच्या कुटुंबासह आनंदाने जगत होतो. पण एप्रिलमध्ये माझ्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. ऑनलाइन काम करण्याची ऑफर आली होती. माझ्या गरजांमुळे मी या कामासाठी तयार झालो. सुरुवातीला थोडा फायदा झाला. पण, पुढं गेल्यावर कामाचा लोड इतका वाढला की आपलं काम आणि याकामासाठी लागलेल्या खर्चाचा हिशोब ठेवता आला नाही. ही दलदल होती. यातून बाहेर पडणं कठीण होतं. जेव्हा सर्व पैसे संपले तेव्हा कंपनीने कर्ज देऊ केले. ते पैसे मी पाण्यासारखे कंपनीत गुंतवत राहिलो.

Faf Du Plessis Birthday: क्रिकेट विश्वाचा ‘राजा’ ज्याला क्रिकेट बोर्ड सक्तीने निवृत्त करतंय 

लोन अॅपच्या दलदलीतून बाहेर पडायचे होते, पण…
‘काम सुरू करण्यापूर्वी मी ई-कॉमर्स कंपनीची वेबसाइट तपासली होती. कोविड नंतर 2022 मध्ये कोलंबियापासून सुरू झालेल्या TRP साठी कंपनी काम करते. हे सर्व पाहून मी कामाला सुरुवात केली, पण मला माहिती नव्हतं, याकंपनीत काम करायला लागल्यावर मला कर्जबाजारी व्हायची वेळ येईल. माझ्या पत्नीला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला या कामाची माहिती नव्हती. खरंतर ऑनलाइन जॉब मिळाल्यावर मला वाटलं की, या कामाचे पैसे मिळताच सगळ्यांचे कर्ज काढून टाकू, पण एवढे काही होईल हे मला समजलंच नाही.

लोन कंपनीनं माझ्यावर एवढं कर्ज केलं की, मला स्वतःलाही आश्चर्य वाटलं. माझी फसवणूक झाल्याचे मला समजलं. माझ्यावर वेळोवेळी पैशाचा दबाव आणला जात होता. जूनमध्ये कर्जाचा बोजा इतका वाढला की वसुली करणाऱ्यांच्या धमक्या येऊ लागल्या. जुलैमध्ये कर्जदारांनी माझा फोन हॅक केला. त्यातून काही डिटेल्स काढून त्यांनी माझे नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तुमचे अश्लील तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यचाी धमकी लोन कंपनीने द्यायला सुरुवात केली. ‘

मी सायबर क्राईमच्या कार्यालयात गेलो, मात्र तेथे अधिकारी नसल्यामुळे आणि सुट्टीमुळे प्रकरण पुढे ढकलण्यात आले. या प्रकारामुळं मला ना कुणाच्या नजरेला नजर भिडवता येत असे. म्हणूनच मी माझी पत्नी आणि मुले ऋषू आणि किशू यांना या सर्वांना सोबत घेऊन जात आहे. मी पुन्हा एकदा माफी मागतो. कृपया माझ्या कुटुंबाला क्षमा करा. मी मजबूर आहे आम्ही निघून गेल्यावर कदाचित सर्व काही ठीक होईल. आम्ही गेल्यानंतर कुटुंबीयांना कर्जासाठी त्रास देऊ नये. तसेच कोणत्याही नातेवाईक किंवा सहकारी कर्मचाऱ्याला त्रास देऊ नये, असं या सुसाईडनोटमध्ये लिहिलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube