मतदार ओळखपत्राबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; आता आधार आणि मोबाइल नंबर लागणारच !
मतदार यादीत नाव नोंदणी करणे, हटविणे किंवा दुरुस्ती करायची असेल तर आधार व मोबाइल नंबर लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Online voter ID: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भारत निवडणूक आयोगावर (Election Commission of India) विरोधीपक्षाकडून संशय व्यक्त करत आरोप केले जात आहेत. या आरोपांना निवडणूक आयोगाकडून पुराव्यासह उत्तर दिले जात आहे. परंतु आता निवडणूक आयोगाने ऑनलाइन मतदार नोंदणी (Online voter ID) आणि ओळखपत्राबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीत नाव नोंदणी करणे, हटविणे किंवा दुरुस्ती करायची असेल तर आधार व मोबाइल नंबर लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नंदूरबार तापलं! मूक मोर्चाला हिंसक वळण; दगडफेक, गाड्यांची तोडफोड, पोलिसांचा लाठीचार्ज
तरच नाव नोंदणीचे अर्ज स्वीकारले जाणार
गेल्या महिन्यात हा महत्त्वाचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यानंतर आयोगाच्या आयटी विभागाने सर्व तयार करत अशी यंत्रणा उभारली आहे. ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर आता मोबाइल नंबर लिंक असलेल्या आधार क्रमांकधारकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
कर्नाटकात मोठ्या प्रमाणात मतदार वगळण्यावरून वाद सुरू आहे. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरून निवडणूक आयोगाला घेरले आहे. कर्नाटकात पद्धतशीर मतदार वगळण्याचे काम सुरू आहे. त्यामागे तिसरी शक्ती आहे. अलांड विधानसभा मतदारसंघातून सहा हजार मतदार वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांचा आहे. याबाबत राहुल गांधी म्हणतात की ही साधी चूक नव्हती तर एक संघटित कट होता. लवकरच आणखी मोठे खुलासे होतील.
सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन प्रमाणपत्र घेणार; पडळकरांसमोर बोऱ्हाडेंचा फडणवीसांवर निशाणा
राहुल गांधींचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले
कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अंबुकुमार यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावलेत. ते म्हणाले, अलांड विधानसभा मतदारसंघातील सहा हजार मतदार वगळण्यासाठी डिसेंबर 2022 मध्ये ऑनलाइन फॉर्म-सात अर्ज प्राप्त झाले होते. या मोठ्या संख्येमुळे, चौकशी करण्यात आली. त्यात फक्त 24 अर्ज बरोबर आढळले. तर 5999 अर्ज चुकीचे आढळले. ते अर्ज नामंजूर करण्यात आलेत. याचा अर्थ असा की मोठ्या प्रमाणात मतदार वगळण्यात आले नाहीत. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एफआयआर देखील नोंदविण्यात आली आहे.