Aditya L1 ने इस्त्रोला पाठवला सेल्फी, पृथ्वी आणि चंद्राचे फोटोही केलेत क्लिक
Aditya L1 : भारताने चांद्रयान मोहिमेनंतर आता सूर्य मिशन (Sun Mission) हाती घेतलं. 2 सप्टेंबरला इस्रोचे आदित्य एल1 अवकाशात झेपावलं आणि इस्रोनं (ISRO) पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. दरम्यान, इस्रोकडून आपल्या ट्विटर हँडलवर सातत्यानं आदित्यच्या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात आहे. अशातच इस्रोनं आणखी एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये आदित्य एल1नं (Aditya L1) काढलेला सेल्फी ट्वीट केला.
https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI
इस्त्रोकडून आदित्य एल1 चा प्रवास कसा सुरू आहे, याबाबत सातत्याने अपडेट दिली जाते. सध्या आदित्य योग्य प्रकारे काम करत आहे. त्याने एक सेल्फी पाठवून त्यावर लावलेले कॅमेर सुस्थितीत असल्याची माहिती दिली. इस्त्रोने याबाबत एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये आदित्य L1 ने काढलेला सेल्फी आहे. या फोटोसोबत आदित्य L1 ने कॅमेरा मधून एक व्हिडिओ देखील काढला आहे. या व्हिडिओमध्ये चंद्र आणि पृथ्वीचे अप्रतिम दृश्य दाखवण्यात आले आहे.
Aditya-L1 Mission:
👀Onlooker!Aditya-L1,
destined for the Sun-Earth L1 point,
takes a selfie and
images of the Earth and the Moon.#AdityaL1 pic.twitter.com/54KxrfYSwy— ISRO (@isro) September 7, 2023
2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C57 च्या XL आवृत्ती रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आली. प्रक्षेपणानंतर 63 मिनिटे आणि 19 सेकंदांनी, अंतराळयान पृथ्वीभोवती 235 किमी x 19500 किमीच्या कक्षेत ठेवण्यात आले.
Maratha Reservation : कुणबी दाखला मिळणार! गठीत केलेल्या समितीची कार्यपद्धती कशी असणार?
आता इस्रोने दुसऱ्यांदा आदित्य एल-1 ची कक्षा वाढवली आहे. आता आदित्य L-1 पृथ्वीपासून 40 हजार 225 किलोमीटर अंतरावर पोहोचले आहे. 10 सप्टेंबर रोजी तिसरा थ्रस्टर फायर करून आदित्य एल-1 ची कक्षा तिसऱ्यांदा वाढवली जाईल.
शास्त्रज्ञांच्या मते, सूर्याचा पहिला फोटो फेब्रुवारीमध्ये उपलब्ध मिळेल. VELC ची निर्मिती ही भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. ITRO च्या आदित्य L1 मोहिमेत VELC कॅमेरा सूर्याची HD प्रतिमा घेईल. आदित्य एल-१ सोबत सात पेलोड पाठवण्यात आले आहेत. हे मिशन केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरेल.