Adani Share Price : अदानीच्या घसरणीचा LIC नंतर आता SBI लाही फटका, गुंतवणूकदार अडचणीत

  • Written By: Published:
Adani Share Price : अदानीच्या घसरणीचा LIC नंतर आता SBI लाही फटका, गुंतवणूकदार अडचणीत

एका महिन्यापूर्वी अदानी ग्रुपला धक्का देणारा हिंडेनबर्ग रिपोर्ट आला. हिंडेनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टने उद्योगपती गौतम अदानी यांना आणि त्यांच्या अदानी ग्रुपला मोठा धक्का दिला. गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेली अदानी ग्रुपची शेअर बाजारातील घसरण अजूनही थांबायचं नाव घेत नाही. बाजारातील घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या बाजारमुल्यासोबतच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संप्पतीमध्येही मोठी घसरण होत आहे.

पण या सगळ्यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीला (LIC) ला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपची बाजारात सतत घसरण सुरु आहे. त्यामुळे सुरुवातीला एलआयसीच्या अदानीमधील गुंतवणुकीचा नफा कमी कमी होत आता ही गुंतवणूक नकारात्मक झाली आहे. म्हणजे आता LIC अदानीच्या शेअर्समध्ये तोट्यात आली आहे. LIC नंतर आता SBI ला देखील याचा मोठा फटका बसताना दिसत आहे.

हेही वाचा : Kasba Bypoll Election : भाजपा उमेदवार रासनेंनंतर मविआचे रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल

अदानी ग्रुपने देशातील अनेक मोठ्या बँकेकडून कर्ज घेतलं आहे. यामध्ये स्टेट बँकेकडून मोठं कर्ज घेतलं आहे. अदानींवरील वाढत्या कर्जाचा बोजा पाहता एसबीआय गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अदानी कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी ठरल्या बँकेचे नुकसान होईल, अशी भीती सध्या बाजारात आहेत. याच्या पार्श्वभूमीवर SBI चे शेअर्स १४ टक्क्यांपर्यंत घसरले होते. २३ जानेवारी रोजी शेअरचा भाव ६०४.६० रुपये होता, तो २३ फेब्रुवारीला ५२१ रुपयांवर पोहचला आहे.

अब्जाधीशांच्या यादीत अदानी 33 व्या क्रमांकावर

हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी गौतम अदानी हे इलॉन मस्क, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि जेफ बेझोस यांच्यानंतर अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होते. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती 116 अब्ज डॉलर इतकी होती. हिंडेनबर्ग अहवाल २४ जानेवारीला प्रसिद्ध झाला आणि २५ पासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरु झाली, जी अजूनही सुरूच आहे.

अदानी ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये १२ लाख कोटी रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. दरम्यान, शेअर्सच्या किमती घसरल्याने गौतम अदानी यांची नेट वर्थही कमी झाली आणि श्रीमंतांच्या यादीतील त्यांचं स्थानही सतत घसरत आहे. आता ते टॉप-३० मधून बाहेर पडून ३३व्या स्थानावर पोहोचले आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube