पवार-ठाकरे भेटीनंतर आता राहुल-नितीश यांची भेट; विरोधकांच्या एकजुटीची चर्चा

  • Written By: Published:
पवार-ठाकरे भेटीनंतर आता राहुल-नितीश यांची भेट; विरोधकांच्या एकजुटीची चर्चा

काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्भव ठाकरे यांची बैठक झाली. त्यांच्या या भेटीनंतर अनेक वेगवेगळ्या राजकीय चर्चा रंगल्या. अनेक तर्क-वितर्क काढले गेले. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानतर उद्धव ठाकरे तात्काळ सिल्व्हर ओक निवासस्थानी आले होते. त्यानंतर काल  दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा भेट झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून महाआघाडी मध्ये सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीच्या सभेत नाना पटोले यांची गैरहजेरी, त्यावर संजय राऊत यांच खोचक उत्तर आणि पुन्हा नाना पटोले यांच मी आलो की इतर आजारी पडतात हे दिलेलं प्रतिउत्तर.

राजकीय वर्तुळाला चिंता मविआची; मात्र, पवार-ठाकरेंमध्ये चर्चा ताडोबाच्या वाघांची

याशिवाय गेल्या काही दिवसापासून सावरकरवाद, अजित पवार यांच्याविषयीच्या भूमिका, अदानी बाबत शरद पवार यांनी मांडलेली भूमिका यासह अनेक बातम्या वर वादळ उठले आहे. अशा परिस्थितीत महाविकासआघाडी वाटचाल करत आहे. पण हे वाद त्या त्या वेळी शमले होते.

आता देशात मार्क्सवादी, राष्ट्रवादी, तृणमूल या सारख्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा संपुष्ठात आला आहे. यामुळे विरोधकांमध्ये चांगलीच अस्वस्थता आहे. राष्ट्रीय पक्ष दर्जा काढल्यानंतर शिवसेनेसारखीच या पक्षाची अवस्था होईल का? यावर चर्चा सुरु आहे. देशात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेबाबतचा निकाल या महिन्यात येणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत शरद पवार आणि उद्भव ठाकरे भेट झाली आहे. या भेटी विषयी प्रत्येक जण आपले तर्क वितर्क लढवत आहेत.

शाब्दिक चकमकीनंतर आमदार वैभव नाईकांच्या अंगावर राणे समर्थक धावले…

दरम्यानच्या काळात आज राष्ट्रीय राजकारणात देखील मोठी घटना घडली आहे. कधी काळी राहुल गांधी यांच्यावर टीका करणारे नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे देखील राहुल गांधीना आज भेटले आहेत. शरद पवार आणि उद्भव ठाकरे भेट ही देखील याच भागाची कडी आहे का याकडेही राजकिय विश्लेषक लक्ष ठेऊन आहेत.

देशाच्या राजकारणात लोकसभेच्या ४८ जागा असलेला महाराष्ट्र मोठी भूमिका निभावणार आहेत. आगामी काळात विरोधकांची एकजुट हा मोठा मुद्दा समोर येतोय. अशा परिस्थितीत या पवार ठाकरे या दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वपूर्णमानली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube