भारताची मोठी कारवाई, लाहोर, मुलतान, सरगोधा, फैसलाबादमधील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट

Air Defence Systems : भारताने गुरुवारी पाकिस्तानच्या लाहोर, मुलतान, सरगोधा, फैसलाबाद येथे हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. आज पाकिस्तानकडून देशातील अनेक शहरात हल्ले करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते मात्र जे भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी हाणून पाडले.
पाकिस्तानने गुरुवारी रात्री ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारताच्या पश्चिम सीमेवरील विविध ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे भारत सरकारने एक्स ला आदेश देत भारतात 8 हजार पाकिस्तानी अकाउंट बंद करण्याचे आदेश दिले आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानकडून येणारी चुकीची माहिती थांबवण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत ‘एक्स’ ला देशातून 8 हजार अकाउंट बंद करण्याचे आदेश दिले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरात हल्ले करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. आतापर्यंत भारतीय लष्कराकडून 50 पेक्षा जास्त ड्रोन पाडण्यात आले आहे. तर आता भारताने देखील पाकिस्तानवर हवाई हल्ले सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे. भारताकडून लाहोर, कराची आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे हवाई हल्ले करण्यात येत आहे.