अमित शाह यांनी सपाच्या किल्ल्यात अखिलेश यादवांना घेरलं

अमित शाह यांनी सपाच्या किल्ल्यात अखिलेश यादवांना घेरलं

Amit Shah In UP:उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. यावेळी समाजवादी पार्टीचा गड मानल्या जाणाऱ्या आजमगडमध्ये गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज अखिलेश यादवांवर जोगदार टीका केली. यामध्ये त्यांनी कोरोना काळात अखिलेश यादव खासदार असताना ही त्यांनी लसीकरण केलं नाही. भाजपने हे लसीकरण केल्याचं म्हणत अखिलेश यादवांवर ताशेरे ओढले आहेत.

अमित शाह म्हणाले की, मला आठवतयं पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये कधीही वीज नसायची केवळ ती रमजानमध्येच असायची. तर आजमगडची प्रतिमा सपा-बसपा सरकारने धुळीत मिळवण्याचं काम केल्याचं देखील ते यावेळी म्हणाले. पण आता भजपचं सरकार आल्यानंतर ज्या आजमगडला दहशदवादाचं केंद्र म्हणून ओळखलं जायचं त्याला आता संगीत विद्यालयाचं माहेरघर मानलं जाऊ लागलं आहे. उत्तर प्रदेशात कधी दंगल होणार नाही अशी कल्पनाच केली जात नव्हती. पण भाजर सरकारने उत्तर प्रदेशला दंगलमुक्त केले आहे.

पोलिसांवर राजकीय दबाव; खासदार विखेंचे मोठे विधान

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभुमीवर नेत्यांच्या आमि मंत्र्यांच्या सभा होऊ लागल्या आहेत. यावेळी देखील अमित शाह यांनी आजमगडमध्ये जनतेला थेट मोदी आणि भाजपला मतदान करण्याचं अवाहन केलं. त्याचबरोबर यावेळी त्यांनी युपीमध्ये विकास कामांचं भुमीपूजन केलं. तर आता युपी विकासाच्या मार्गावर चालला आहे. असं देखील ते म्हणाले. तसेच 2024 मध्ये कॉंग्रेस, सपा, बसपा पुन्हा घराणेशाही आणि जातीवादावर लोकांना भडकवतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube