अॅपलचा मोठा निर्णय! एका ग्राहकाला दोनच आयफोन; भारत-अमेरिकेत खरेदीवर मर्यादा
Apple iPhone Purchase Limit: अॅपल कंपनीने ठराविक मॉडेलचे दोन पेक्षा जास्त आयफोन खरेदी करता येणार नाही, असा नियम केला आहे.
Apple iPhone Purchase Limit in India: आयफोन प्रेमींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अॅपल कंपनीने आयफोन खरेदीबाबत कडक नियम केले आहेत. कंपनीने एका ग्राहकाला ठराविक मॉडेलचे दोन पेक्षा जास्त आयफोन खरेदी करता येणार नाही असा नियम केला आहे. सुरुवातीला हा नियम सिंगापूर, चीन, हाँगकाँग या देशांसाठी होता, मात्र आता हा नियम भारत आणि अमेरिकासाठी लागू करण्यात आला आहे.
थरारक शोधावर आधारित “मिरांडा वॉर्निंग” चा टीजर लाँच! चित्रपटात दमदार कलाकारांची फौज
‘या’ मॉडेल्सवर लावली खरेदीची मर्यादा
अॅपलच्या नवीन नियमानुसार iPhone Duo, iPhone 17, iPhone 18 Pro,आणि iPhone 18 Pro Max या मॉडेल्सवर खरेदीचे नियम लावले आहेत. त्यामुळे एका ग्राहकाला एका मॉडल्सचे दोनच आयफोन खरेदी करता येणार आहेत.
अॅपलच्या भारतीय वेबसाईटवर एकाच खात्यावरुन दोन पेक्षा जास्त iPhone Duo, iPhone 17, iPhone 18 Pro,आणि iPhone 18 Pro Max याची ऑर्डर देण्यात आली, तेव्हा वेबासाईटने खरेदीची मर्यादा स्पष्ट केली. एका ग्राहकाला फक्त दोन युनिट्सची खरेदी करता येणार, असा मॅसेज वेबसाईटवर दाखवण्यात येत आहे.
अमेरिकेतही अशाच प्रकारचा नियम अॅपलने लागू केला आहे. तेथील ऑनलाईन स्टोअरवर अशाच प्रकारचा मॅसेज दाखवत आहे. अमेरिकन वेबसाईटवर “प्रत्येक ग्राहक जास्तीत जास्त 2 आयफोन (iPhone) खरेदी करू शकतो. कृपया पेमेंट करण्यापूर्वी तुमच्या ऑर्डरमधील आयफोनची एकूण संख्या तपासून आवश्यक तो बदल करा.” असा मॅसेज ग्राहकांना दाखवला जातोय.
खरेदीवर मर्यादा का?
तज्ज्ञांच्या मते, नवीन आयफोन मॉडेल्सना मिळणारी वाढती मागणी आणि मोठ्या प्रमाणावर खरेदी करून त्यांची जास्त दराने विक्री करण्याचा संभाव्य प्रकार रोखण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असावा. मात्र, खरेदीवरील या मर्यादेमागील अधिकृत कारणांची खातरजमा अजून झालेली नाही.