Tripura Elections 2023 : त्रिपुरातील आठ जिल्ह्यात आज विधानसभेसाठी मतदान
नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये (Tripura Elections )आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 28 लाखांहून अधिक मतदार 269 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यामध्ये 22 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, डावे, टिपरा मोथा, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्ष या निवडणुकीत भाग घेत आहेत. राज्यात एकूण 3,336 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने महिला, तरुण आणि दिव्यांगांसाठी मॉडेल मतदान केंद्रेही स्थापन केली आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी मतदान केले
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आगरतळा येथे मतदान केले. आम्हाला शांततेत मतदान हवे आहे, असे ते म्हणाले. लोक मला विचारतात माझ्यासमोर आव्हान काय आहे? अपवित्र युती करून एकत्र आलेल्या प्रतिस्पर्ध्यांनी (काँग्रेस-डावे) शांतता राखली पाहिजे, हे आव्हान त्यांनी यावेळी बोलताना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील जनतेला विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. एका ट्विट संदेशात मोदींनी लोकशाही बळकट करण्याच्या या उत्सवात तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
गृहमंत्री अमित शाह यांनी त्रिपुरातील जनतेला आजच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे, एका ट्विट संदेशात शाह यांनी मतदारांना विकासाभिमुख सरकार स्थापन करण्यासाठी बाहेर पडून समृद्ध त्रिपुरासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Supreme Court : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी
बंदोबस्त तैनात
निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी 31,000 मतदान कर्मचारी आणि केंद्रीय दलातील 25,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सशस्त्र पोलीस आणि राज्य पोलीस दलाचे 31,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.