Bageshwar Baba अडचणीत, कार्यक्रमादरम्यान महिलेचा मृत्यू

Bageshwar Baba अडचणीत, कार्यक्रमादरम्यान महिलेचा मृत्यू

भोपाळ : संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम बाबा (Bageshwar Baba) चर्चेत आला होता. नागपूरातील (Nagpur) एका कार्यक्रमात बाबा अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करत श्याम मानव (Shyam Manav) यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर मोठा वादही निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा बागेश्वर धाम बाबा वादात सापडला आहे.

सध्या बागेश्वर धाममध्ये धार्मिक महाकुंभाचे आयोजन केले आहे. या महाकुंभात पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pandit Dhirendra Krishna Shastri) यांनी ‘दैवी चमत्कारी’ दरबार उभारला आहे. या कार्यक्रमादरम्यान छतरपूर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. ती महिला गेल्या काही दिवसांपासून महिला आजारी होती.

हे देखील वाचा
Prithvi Shaw : मुंबईत क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला

त्या महिलेचे नाव नीलम देवी असून उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील रहिवासी होती. नीलम देवी आजारी होत्या. बागेश्वर धामच्या कार्यक्रमस्थळाजवळ नीलम देवी यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.

महिलेचा पती देवेंद्र सिंह म्हणाला, ती आजारी होती आणि मी तिच्यासोबत रोज परिक्रमा करत होतो. मधेच तिची प्रकृती ढासळायची. त्यानंतर 15 फेब्रुवारीला सकाळी तब्येत थोडी बरी होती, म्हणून बागेश्वर धामच्या दरबारात गेलो होतो. सकाळी पंडालमध्ये भोजनही केले. पण संध्याकाळी अचानक प्रकृती खालावली आणि माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात ते पहावं लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube