बिहार हादरलं! अररियामध्ये भूकंपाचे धक्के…

बिहार हादरलं! अररियामध्ये भूकंपाचे धक्के…

बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिहारला भूकंपाचे धक्के(Bihar Earthquake) जाणवल्याची माहिती समोर आलीय. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली असून हे भूकंपाचे धक्के अररियामध्ये पहाटेच्या सुमारास जाणवले आहेत.

मोठी बातमी ! सोनी हत्याकांडातील सात मारेकर्‍यांना जन्मठेप

अररियामध्ये झालेल्या भूंकपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आतमध्ये 10 किमी खोलवर असल्याचं समोर आलंय. दरम्यान, पहाटेच्या सुमारास झालेल्या या भूंकपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

JPC समितीला पंतप्रधान मोदी का घाबरतात? नाना पटोले आक्रमक

तसेच बिहारपाठोपाठ पश्चिम बंगालमधील सिलीगुडी इथंही असंच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सिलीगुडीच्या दक्षिण-पश्चिमेला 140 किमी अंतरावर झालेल्या भूकंपाची नोंद राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडे झालीय. नोंदणीनूसार पहाटे 5 : 35 वाजता भूकंप झालाय. यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही.

सावधान! तुम्ही पण गोमूत्र पिताय? अभ्यासातून झाला धक्कादायक खुलासा

मागील काही दिवसांपासून देशातील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. अलीकडेच अंदमान निकोबारमध्ये रात्रीच्या सुमारास पृथ्वी हादरली होती. निकोबार बेट कॅम्पबेल खाडीच्या उत्तरेस भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का जवळपास 220 किमी अंतरावर बसला आहे.

दरम्यान, एनसीएसनुसार, निकोबारमध्ये 10 एप्रिलच्या रात्री झालेल्या भूकंपाची खोली 32 किमी होती. 3 एप्रिल रोजी पहाटे 4.33 वाजता उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.8 एवढी होती. त्याचे केंद्र जमिनीच्या आत 10 किमी खोल असल्याचे सांगण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube