Parle Products IPO : बिस्किट उत्पादक कंपनी पार्ले-जी आणणार IPO; जाणून घ्या कधी होणार लॉन्च
Parle Products IPO : भारतीय शेअर बाजारात मोठा धमाका करण्याची तयारी बिस्किट उत्पादक कंपनी पार्ले प्रॉडक्ट्स लिमिटेड करत आहे.
Parle Products IPO : भारतीय शेअर बाजारात मोठा धमाका करण्याची तयारी बिस्किट उत्पादक कंपनी पार्ले प्रॉडक्ट्स लिमिटेड करत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच आयपीओ आणणार आहे. एका अहवालानुसार, कंपनीचे प्रवर्तक असलेल्या चौहान कुटुंबाची पुढील वर्षी 1 अब्ज डॉलर्स (9,530 कोटी रुपये) पेक्षा जास्त मूल्याचा मोठा आयपीओ आणण्याची योजना आहे. पार्ले-जी (Parle-G), मॅंगो बाइट (Mango Bite) आणि मेलोडी (Melody) यांसारखे लोकप्रिय ब्रँड्स पार्ले प्रॉडक्ट्सच्या मालकीचे आहेत.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आयपीओची प्रक्रिया सध्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र तरीही पार्ले प्रॉडक्ट्स 10.5 अब्ज डॉलर्स (1 लाख कोटी रुपयांहून अधिक) पेक्षा जास्त मूल्यांकनाचे (valuation) लक्ष्य ठेवून आहे मात्र या तपशीलमध्ये नंतर बदलू शकते. सध्या कंपनीने कोटक महिंद्रा कॅपिटल, ॲक्सिस कॅपिटल आणि एचएसबीसी सिक्युरिटीज (HSBC Securities) यांची सल्लागार म्हणून निवड केली आहे.
आम्ही बाजारातील तर्क-वितर्कांवर भाष्य करत नाही. आमचे सध्याचे लक्ष व्यवसाय चालवणे आणि त्याचा विस्तार करणे यावर आहे. आमच्यासारख्या मोठ्या कंपनीच्या बाबतीत, आम्ही सतत अशा पर्यायांचा विचार करत असतो ज्यामुळे आमची वाढ होऊ शकेल असं कंपनीचे सीएमओ मयंक शाह यांनी म्हटले आहे.
कंपनीबद्दल माहिती
मुंबईतील विलेपार्ले येथे मुख्यालय असलेल्या ‘पार्ले प्रॉडक्ट्स’ची स्थापना 1929 मध्ये झाली. आर्थिक वर्ष 2025 मध्ये, कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात 8.5% वाढ होऊन तो 15,568.49 कोटींवर पोहोचला, तर नफ्यात 39% घट होऊन तो 979.53 कोटींवर आला.
CET Cell कडून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; 12 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी-
कंपनीच्या संकेतस्थळानुसार, त्यांची उत्पादने अमेरिका, युनायटेड किंगडम (UK), कॅनडा, न्यूझीलंड आणि मध्य पूर्व देशांमध्ये विकली जातात. याव्यतिरिक्त, नायजेरिया, कॅमेरून, घाना, इथिओपिया, केनिया, आयव्हरी कोस्ट, नेपाळ आणि मेक्सिको यांसारख्या भारताबाहेरील अनेक देशांमध्ये कंपनीचे उत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत.