Video : तामिळनाडूत पर्यटकांची बस दरीत कोसळली, भीषण अपघातात आठ ठार
Bus Fell Into Gorge In TamilNadu : तामिळनाडू राज्यात मोठा बस अपघात (Bus Accident) झाला आहे. पर्यटकांची (Tourist) बस दरीत कोसळली आहे. यात आठ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर 35 हून अधिक प्रवासी जखमी झालेत. निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमधील (Coonoor) मारापलम येथे हा अपघात झाला आहे. ही बस ऊटीहून मेट्टूपालयमलाकडे जात होती. बसमध्ये 55 पर्यटक प्रवास करत होते. जखमींना कुन्नूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
Ajit Pawar यांच्या सोबत गेलेल सर्व आमदार स्वगृही परतण्याच्या विचारात; जयंत पाटलांचा मोठा दावा
कोयंबटूरचे पोलिस महानिरीक्षक सरवण सुंदर यांनीही याबत माहिती दिली. आठ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही पर्यटक गंभीर जखमी आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. ही प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, उत्तर महाराष्ट्रातून 4 दिवसांत पाऊस मागे फिरणार
या अपघातानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आर्थिक मदत घोषित केली आहे. ठार झालेल्यांच्या नातेवाइकांना आठ लाख रुपये, तर गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.
VIDEO | Eight people dead, more than thirty injured after a tourist bus fell into a gorge in Coonoor area of Tamil Nadu's Nilgiris district.
CM Stalin has announced an ex-gratia amount of Rs 8 lakh each for the kin of dead and Rs 1 lakh each for seriously injured while Rs 50,000… pic.twitter.com/GtKlRiZimg
— Press Trust of India (@PTI_News) September 30, 2023