Download App

सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय; मातृभाषेतून विद्यार्थ्यी धडे गिरवणार

CBSE Board Schools: आतापर्यंत सीबीएसई बोर्डाचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होत होते. मात्र आता बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संलग्न शाळांना पूर्व-प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षणाचे पर्यायी माध्यम म्हणून मातृभाषा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

CBSE च्या मते, हा निर्णय NEP 2020 च्या तरतुदींनुसार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी बहुभाषिकतेच्या महत्त्वाच्या संज्ञानात्मक फायद्यांवर जोर देतो. या दरम्यान मातृभाषेवर विशेष लक्ष केंद्रित करून अनेक भाषा शिकवल्या जातील.बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकामध्ये असे म्हटले आहे की, “… CBSE शी संलग्न शाळा भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 8 मध्ये नमूद केलेल्या भारतीय भाषांचा वापर मूलभूत टप्प्यापासून माध्यमिक टप्प्याच्या शेवटपर्यंत म्हणजे पूर्व प्राथमिक वर्गापासून ते बारावीपर्यंतच्या इतर पर्यायांव्यतिरिक्त पर्यायी माध्यम म्हणून विचार करू शकतात.”

कुस्तीपटूंना उच्च न्यायालयाचा दिलासा, आशियाई खेळांसाठी थेट प्रवेशाविरोधातील याचिका फेटाळली

NCERT पुस्तके तयार करेल
सीबीएसई मंडळाने विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेणे शक्य केले आहे. त्यासाठी चांगल्या शिक्षकांची उपलब्धता, पाठ्यपुस्तके आणि वेळ ही आव्हाने लक्षात घेऊन उपलब्ध साधनांचा शोध घेणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, शिक्षण मंत्रालयाच्या वतीने, एनसीईआरटीला 22 अनुसूचित भाषांमध्ये नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. वृत्तानुसार, पुढील सत्रापासून हे पुस्तक उपलब्ध होईल. CBSE बोर्ड हे देशातील सर्वात मोठे बोर्ड आहे. दरवर्षी 30 लाखांहून अधिक विद्यार्थी CBSE बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षेला बसतात.

Tags

follow us