CBSE Exam 2023 : सीबीएसई बोर्ड परीक्षेची तारीख ठरली!

CBSE Exam 2023 : सीबीएसई बोर्ड परीक्षेची तारीख ठरली!

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) दहावी आणि बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणारंय. लवकरच विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र (Hall Ticket) जारी केलं जाणारंय. प्रवेशपत्र जारी झाल्यावर विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिलं जाणारंय. विद्यार्थी cbse.nic.in आणि cbse.gov.in या वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

सीबीएसई परीक्षेचं (CBSE Exam 2023) हॉल तिकीट (Hall Ticket) डाऊनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांच्या ओळखपत्रांसह CBSE बोर्डाच्या वेबसाईटवर लॉग इन करावं लागणारंय. त्यासाठी विद्यार्थी त्यांच्या शाळेची मदत घेऊ शकतात. सीबीएसई बोर्ड परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक उपलब्ध झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणारंय.

सीबीएसई बोर्डानं cbseacademic.nic.in वर इयत्ता दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका, प्रश्न बँक आणि मार्किंग पॅटर्न जारी केलाय. विद्यार्थी वेबसाईटवर जाऊन ते चेक करता येणार आहे.

सीबीएसई बोर्डाच्या सत्र 2022-23 च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या (CBSE 12th Board Exam 2023) परीक्षा कोरोनापूर्वीच्या (Coronavirus) अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. कोरोनामुळं CBSE नं गेल्या वर्षी अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली. सीबीएसईची परीक्षा (CBSE Exams) नियंत्रक संयम भारद्वाज यांनी याबद्दल माहिती दिलीय.

दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक देखील दिलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube