Download App

Chandrayaan3 ची मोठी कामगिरी; यशस्वीपणे वेगळा झाला लँडर ‘विक्रम’!

Chandrayaan3 : अंतरिक्ष जगतात भारत पुढील आठवड्यात नवीन इतिहास नक्कीच रचू शकतो. भारताचे चांद्रयान (Chandrayaan3) आता चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. गुरुवारी लँडर विक्रम प्रपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाले. आता विक्रम लँडर चंद्राच्या जमिनीवर सॉफ्ट लँडिंग करेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जागा निश्चित आहे. ज्यासाठी लँडर विक्रमने आपला प्रवास सुरू केला आहे.

चंद्रयान 3 ची यशस्वी लँडिंग झाल्यानंतर ही कामगिरी करणारा जगातील चौथा देश असेल. अमेरिका, रशिया, चीन या देशांच्या रांगेत भारतही असेल. सध्या तरी या तीन देशांव्यतिरिक्त अन्य कोणताही देश ही कामगिरी करू शकलेला नाही. इस्त्रोने सांगितले की गुरुवारी दुपारी चंद्रयान 3 चे प्रपोल्शन मॉडेलला त्याच्या लँडर मॉडेलपासून यशस्वीपणे वेगळे केले गेले. यानंतर आता चंद्रावर उतरण्यासाठीचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे.

यानंतर अंतराळ यानाचे सॉफ्ट लँडिंगचा प्रवास सुरू झाला आहे. या टप्प्यात आता 18 आणि 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या डीऑआर्बिटिंगच्या माध्यमातून विक्रम लँडरला 30 किलोमीटर पेरील्यून आणि 100 किलोमीटर एपोल्यून ऑर्बिटमध्ये टाकले जाईल. प्रोपल्शन मॉडेलपासून वेगळे झाल्यानंतर विक्रम लँडर गोलाकार ऑर्बिटमध्ये फिरणार नाही. 30 KM x 100 KM च्या ऑर्बिटमध्ये चक्कर मारण्यासाठी दोनदा डीऑर्बिटिंग करेल.

चांद्रयान 3 ने पाठवला पहिला Video; ‘ऑर्बिट रिडक्शन’ प्रक्रिया यशस्वी

23 ऑगस्ट चांद्रयान 3 ची अग्निपरीक्षा
आता 23 ऑगस्ट ही भारताच्या चांद्रयानसाठी सर्वात महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करायचे आहे. गेल्या वेळी भारताचे चांद्रयान 2 या टप्प्यावर अयशस्वी झाले होते. पण आता चांद्रयान 3 पूर्ण तयारीनिशी चंद्राकडे वाटचाल करत आहे. मागील चुकांमधून धडा घेत यावेळी 500×500 मीटरच्या छोट्या जागेऐवजी, लँडिंग साइटसाठी 4.3 किमी x 2.5 किमीची मोठी जागा निवडली आहे. म्हणजेच यावेळी लँडरला अधिक जागा मिळेल आणि तो सॉफ्ट लँडिंग सहज करू शकेल.

Tags

follow us