छत्तीसगडमध्ये बड्या नेत्यांची अवस्था काय? कोण आघाडी अन् पिछाडीवर…

छत्तीसगडमध्ये बड्या नेत्यांची अवस्था काय? कोण आघाडी अन् पिछाडीवर…

Chattisgarth Election Result : छत्तीसगडमध्ये(Chattisgarth Election Result) सत्तांतर झालं आहे. काँग्रेसला चारी मुंड्या चीत करीत भाजपने आपला झेंडा रोवला आहे. 2018 साली काँग्रेसने सत्ता खेचली होती पण, आता मात्र, यंदाच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेले उमेदवार डॉ. रमण सिंह(Raman Singh) 30 हजार 398 मतांनी आघाडीवर आहेत. रमण यांच्यासह इतर उमेदवारांना आघाडी घेत काँग्रेसच्या उमेदवारांना घरी बसवलं आहे.

‘जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून कॉंग्रेसच विजयी होणार’; नाना पटोलेंचा विश्वास

-नारायणपूरमधून भाजपचे केदार कश्यप 10880 मतांनी आघाडीवर आहेत.
-रायपूर नगर दक्षिणमधून भाजपचे बृजमोहन अग्रवाल 28742 मतांनी आघाडीवर आहेत.
-राजनांदगावमधून भाजपचे डॉ. रमण सिंह 30398 मतांनी आघाडीवर आहेत.
-काँग्रेसचे चरणदास महंत 7151 मतांनी आघाडीवर आहेत.
-पाटणमधून काँग्रेसचे भूपेश बघेल 10012 मतांनी आघाडीवर आहेत.
-आरंगमधून काँग्रेसचे डॉ.शिवकुमार दहरिया 9276 मतांनी पिछाडीवर आहेत.
-बैकुंठपूरमधून काँग्रेसच्या अंबिका सिंहदेव 23262 मतांनी पिछाडीवर आहेत.
-दुर्ग ग्रामीणमधून काँग्रेसचे ताम्रध्वज साहू 10620 मतांनी पिछाडीवर आहेत.
-अंबिकापूरमधून काँग्रेसचे टीएस सिंह देव 7420 मतांनी पिछाडीवर आहेत.
-लोर्मीमधून भाजपचे अरुण साओ 29005 मतांनी पुढे आहेत.

KCR यांचे काय चुकले? राष्ट्रीय राजकारणात जात असतानाच स्वतःच्याच राज्याकडे केलेले दुर्लक्ष!

2018 च्या आधी छत्तीसगडमध्ये भाजपकडून डॉ. रमण सिंह मुख्यमंत्री होते. 2018 मध्ये काँग्रेसची सत्ता येत भुपेश बघेल मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. पाच वर्षांच्या काळात अनेक घोटाळे, मद्य घोटाळा, महादेव बेटिंग अॅप प्रकरणावरुन बघेल देशभरात चांगलेच चर्चेत होते. सत्ताधारी बघेल सरकारवर गंभीर आरोप होत असल्याने जनतेने पंतप्रधान मोदींच्या हमीभावावर जनतेने विश्वास ठेवल्याचे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आता भाजपची सत्ता आल्याने सलग तीन टर्म मुख्यमंत्री राहिलेले रमण सिंह भाजपाची पहिली पसंत ठरू शकतात. किंवा आदिवासी समाजातील कुणाला मुख्यमंत्री केले जाणार का? असा प्रश्न आहे. भाजप महाराष्ट्र आणि हरियाणा मॉडेलप्रमाणे येथेही डाव टाकू शकते. तिकीट वाटपापासून सर्व महत्वाचे निर्णय भाजप श्रेष्ठींनीच घेतले. त्यामुळे कोणत्या एका नेत्यासाठी लॉबिंग होताना येथे दिसले नाही.

भाजपने, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपनं जवळपास विजय मिळवला आहे. लोकसभेपूर्वी सेमीफायनल म्हणून बघितल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजपसाठी पुन्हा एकदा मोदी फॅक्टरने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube