Video : काश्मीर खोऱ्यात भारतीय रेल्वेची गरूड भरारी; आयफेल टॉवरपेक्षा उंच ब्रिजवर धावली रेल्वे

  • Written By: Published:
Video : काश्मीर खोऱ्यात भारतीय रेल्वेची गरूड भरारी; आयफेल टॉवरपेक्षा उंच ब्रिजवर धावली रेल्वे

श्रीनगर : भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर रेल्वेची यशस्वी चाचणी केली. चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच पुलावर ही चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा पूल रामबन जिल्ह्यातील सांगलदान आणि रियासी दरम्यान बांधण्यात आला असून, या मार्गावर लवकरच रेल्वे सेवा सुरू होणार आहे. (Indian Railway Build World Largest Bridge On Jammu Kashmir Chinab River )

एकाच वर्षात स्वीस बँकांमधील भारतीयांची ‘माया’ कमालीची घटली : निवडणुकीसाठी खर्च झाला पैसा?

गेल्या रविवारी या पुलावर इलेक्ट्रिक इंजिनची यशस्वी चाचणीही घेण्यात आली होती .हा प्रकल्प स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वेने हाती घेतलेल्या सर्वात आव्हानात्मक कामांपैकी एक आहे. अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी USBRL प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन, 2002 मध्ये याला ‘राष्ट्रीय प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आले होते.

38 बोगदे, 927 पुलांचा समावेश

रामबन जिल्ह्यातील सांगलदान आणि रियासी दरम्यान USBRL अंतर्गत बांधण्यात आलेल्या या विशेष प्रकल्पात 38 बोगदे (एकूण लांबी 119 किलोमीटर) आहेत. सर्वात लांब बोगद्याची (T-49) लांबी 12.75 किलोमीटर आहे. हा देशातील सर्वात लांब वाहतूक बोगदा असून, या प्रकल्पात 927 पुलांचाही समावेश आहे ज्यांची एकूण लांबी 13 किलोमीटर आहे. या पुलांमध्ये चिनाब ब्रिजचाही समावेश आहे. त्याची एकूण लांबी 1315 मीटर, कमानीची लांबी 467 मीटर आणि नदीच्या पात्रापासूनची उंची 359 मीटर असून, याची उंची आयफेल टॉवरपेक्षा अंदाजे 35 मीटर उंच आहे.

ब्रेथ ॲनालायझर मद्य सेवनाचा निर्णायक पुरावा नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

काश्मीर ते कन्याकुमारी जोडले जाणार

सांगलदान ते रियासीदरम्यान रेल्वेच्या यशस्वी चाचणीमुळे काश्मीर खोऱ्याला कन्याकुमारीशी जोडण्याची ही मोठी उपलब्धी असणार आहे. या रेल्वे लिंकमुळे, काश्मीर खोरे आणि उर्वरित देशादरम्यानचा प्रवास येत्या चार ते पाच महिन्यांत सुरू होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील चिनाब नदीवर बांधण्यात आलेला रेल्वे पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे.

चिनाब पुलाशी संबंधित इतर वैशिष्ट्ये 

चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचं बांधकाम खोऱ्यातील वातावरणाचा विचार करून बांधण्यात आला आहे.  उणे -40°C पर्यंत तापमान आणि भूकंपासारख्या अत्यंत बिकट परिस्थितींचा सामना करण्याच्यादृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. पुलाच्या बांधकामावेळी पर्यावरण संरक्षणाच्या उच्च मानकांचे पालन करण्यात आले  आहे. याशिवाय, नदी आणि आजूबाजूच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षणाचाही विचार करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज