China H9N2 : कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका गंभीर आजाराचं संक्रमण; भारताला किती धोका?
China H9N2 : चीनमध्ये कोरोनानंतर पुन्हा एकदा एका गंभीर आजाराने डोक वर काढलं आहे. ‘एच1 एन2’ (China H9N2) असं या आजाराचं नाव आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. या दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील एक्स या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच भारताला या आजाराचा धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती…
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील एक्स या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत माहिती दिली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, भारतीय केंद्रीय आरोग्य मंत्रालय ‘एच1 एन2’ या आजारावर बारिक लक्ष ठेवून आहे. तसेच चीनमध्ये आढळलेले एव्हीएन एन्फ्लुएंझा आणि इतर श्वसनाचे आजार या आजारांचा भारताला धोका कमी आहे. तसेच भारत या आजारांशी सामना करण्यासाठी तयार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.
Union Health Ministry @MoHFW_INDIA is closely monitoring outbreak of #H9N2 and clusters of respiratory illness in children in #China
There is low risk to India from both the avian influenza case reported from China as well as the clusters of respiratory illness…
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) November 24, 2023
दरम्यान या आजाराचा धोका भारताला आणि इतर देशांना कितपत आहे. यावर इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, ‘ऑक्टोबर महिन्यापासून चीनमध्ये व्हायरल निमोनिया या आजाराचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि ज्या लोकांना सहव्याधी आहेत. अशा लोकांचा समावेश आहे.
‘या’ बॅंकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; आरबीआयकडून 12 महिन्यांसाठी संचालक मंडळ बरखास्त
या आजारामध्ये सुरुवातीला सर्दी, खोकला आणि ताप येतो. त्यानंतर छाती भरून येणे, फुफ्फुसांना सूज येणे हे लक्षण दिसायला लागतात आणि त्यातून न्युमोनिया होतो. हा एक अतिशय गंभीर आजार आहे. अशाच प्रकारचा आजार 2019 आणि 2020 च्या सुरुवातीला चीन मधून संपूर्ण जगभरात पसरला. त्यानंतर कोरोनाची साथ सुरू झाली. त्यामुळे या आजाराबद्दल जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.
‘जरांगे पाटलांचं आरक्षण राजकीय दिशेने भरकटतंय’, अमोल मिटकरी स्पष्टच बोलले
मात्र या आजारापासून भारत आणि इतर देशांना काळजी करण्याचे कारण नाही. कारण चीनमधील विशिष्ट काही भागांमध्ये आजाराचा संक्रमण झालेला आहे. तसेच हा आजार पसरू नये यासाठी जागतिक आरोग्य संघटना, चीन आणि इतर देशातील सर्व आरोग्य संस्था काळजी घेत आहेत. यामध्ये असं देखील लक्षात आलं आहे की, मायक्रो प्लाझमा त्याचबरोबर इतरही व्हायरल आजार यामध्ये कारणीभूत असू शकतात. त्यामुळे चीनमध्ये सध्या पसरलेल्या या आजाराची जागतिक सात पसरण्याची शक्यता खूप कमी आहे.’ असं त्यांनी सांगितलं आहे.