Delhi Murder case : दिल्ली पुन्हा हादरली, श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती

Untitled Design   2023 02 14T171436.904

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडा सारखं प्रकरण समोर आलं आहे. दिल्लीतील नजफगढ भागामध्ये मितरांव या गावामध्ये घडली. एका तरूणीचा हत्या करून तिचं शव फ्रिजमध्ये लपवण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी एका ढाब्यावरून हे शव ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येतील आरोपीचं नाव साहिल गहलोत असं असून त्याचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरूणी ही या आरोपीची प्रेयसी होती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी आरोपीच साहिल गहलोत याचं दुसऱ्या तरूणीशी लग्न ठरलं होत मात्र मृत तरूणी ही या आरोपीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करत होती. त्यावरून ही हत्या करण्यात आल्यााचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Pune : कसबा जिंकण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन रिंगणात

श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबने देखील श्रद्धाचं शव फ्रिजमध्येच लपवलं होतं. श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये पोलिसांना तपासा दरम्यान कळालं की, आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या शवाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे केले होते. श्रद्धाच्या शवाचे तुकडे करण्या आधीचं आफताबने नविन फ्रिज खरेदी केलं होतं.

Tags

follow us