Earthquake in Delhi-NCR : दिल्लीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के !

  • Written By: Published:
Earthquake in Delhi-NCR : दिल्लीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के !

दिल्ली-एनसीआर भागात रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. दोन आठवड्यात दुसऱ्यांदा असे धक्के बसले आहेत. दिल्ली, गाजियाबाद, नोएडा भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामूळे काही भागात जास्त हादरले नागरिकांना जाणवले आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. नागरिक हे घरे सोडून मोकळ्या जागेत आल्याचे वृत्त आहे. यापूर्वी तीन ऑक्टोबरलाही दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारतातील काही राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. रविवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता 3.1 रेश्टर स्केल इतकी आहे. हरियाणामधील फरिदाबाद येथे नऊ किलोमीटर खोल भूकंपाचे केंद्र बिंदू असल्याची माहिती नॅशनल सिस्मोलॉजी सेंटरकडून जाहीर करण्यात आली होती.

,Location: 9km E of Faridabad, Haryana, India for more information Download the BhooKamp App


Delhi Earthquake: दिल्ली NCR भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले! नागरिकांची पळापळ>

तीन ऑक्टोबरलाही भूकंपाने दिल्ली हादरली होती. जास्त वेळ धक्के जाणविल्याने नागरिक हे घर, कार्यालयांमधून मोकळ्या जागेत पळाले होते. दिल्लीबरोबर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्येही जोरदार धक्के जाणवले होते. या भूकंपाचे झटके उत्तराखंड राज्यातही बसले होते. दोन वेळा धक्के बसले होते. पहिला झटका 4.6 रिश्टर स्केलचा होता. तर दुसरा धक्का जास्त तीव्रतेचा होता. हा धक्का 6.2 रिश्टर स्केलचा होता, अशी माहिती नॅशनल सिस्मोलॉजी सेंटरकडून जाहीर करण्यात आली होती.

<a href=”https://letsupp.com/international/israel-palestine-war-israel-gives-3-hours-deadline-to-north-gaza-residents-95965.html”>Israel Palestine War : गाझातील नागरिकांना 3 तासांची डेडलाईन; इस्त्रायलने नेमकं काय केलं ?

तेव्हा भूकंपाचे केंद्र नेपाळ होते. दिल्ली, एनसीआर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाबला धक्के जाणवले होते. यात जीवित व वित्तहानी झाली नव्हती. त्यानंतर आता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

दिल्ली संवेदनशील झोनमध्ये

देशाची राजधानी दिल्ली भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानली जाते. भारतातील शास्त्रज्ञांनी भूकंप क्षेत्राची विभागणी झोन-2, झोन-3, झोन-4 आणि झोन-5 अशी केली आहे. झोन-5 मधील क्षेत्र सर्वात संवेदनशील मानले जातात, तर झोन-2 हे सर्वात कमी संवेदनशील मानले जाते. देशाची राजधानी दिल्ली झोन-4 मध्ये येते. त्यामुळे येथे रिश्टर स्केल 7 पेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप देखील होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube